Fri, Jul 03, 2020 18:30होमपेज › Jalna › दरोड्याच्या प्रयत्नातील टोळी जेरबंद

दरोड्याच्या प्रयत्नातील टोळी जेरबंद

Published On: Mar 24 2018 2:13AM | Last Updated: Mar 24 2018 1:45AMजालना : प्रतिनिधी

शहरातील मंठा- अंबड बायपास रस्त्यावर कृष्णकुंज जवळ दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी रात्री जेरबंद केली. या टोळीच्या ताब्यातून एक तलवार, टॉमी, कटर, मिरचीपूड, दोरी असा ऐवज पोलिसांनी जप्‍त केला.

याबाबत सदर बाजार पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंठा- अंबड बायपास रस्त्यावरील कृष्णकुंज सोसायटीजवळ पोलिसांनी दरोडा, वाटमारी अथवा जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या विजयसिंग कृष्णासिंग भादा, हरदिपसिंग टाक, दिपकसिंग टाक, जुन्‍नुसिंग टाक, किशोरसिंग टाक, ज्वालासिंग कलानी यांना तलवार, टामी, कटर व मिरचीपूडसह पकडण्यात आले. यावेळी विजयसिंग भादा, दिपकसिंंग टाक, हरदिपसिंग टाक यांना पोलिसांनी जेरबंद केले असून इतर आरोपी फरार झाले आहेत. या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे जमादार एच.सी. राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.