Thu, Jul 09, 2020 04:18होमपेज › Jalna › शोभायात्रेने वेधले  लक्ष

शोभायात्रेने वेधले  लक्ष

Published On: May 19 2018 1:31AM | Last Updated: May 18 2018 11:22PMजालना : प्रतिनिधी

 महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाउंडेशन, मारवाडी संमेलन, मारवाडी युवा मंच आणि जालना जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जालना महोत्सवाचा प्रारंभ शुक्रवारी (दि.18)  सकाळी शोभायात्रेने झाला. या शोभायात्रेत जालनेकर हे उत्सवाच्या रंगात रंगून गेल्याचे पाहावयास मिळाले.

 जालना शहरात 18 ते 22 मे दरम्यान जालना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी  सकाळी 10.30 वाजता जालना महोत्सवाचे स्वागताध्यक्ष तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते मस्तगड येथील मंमादेवी चौकात श्रीफळ फोडून शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली. शोभायात्रेत जालना येथील नरव्याघ्र ढोलपथक, योगीराज महाराज लोखंडे यांचे भजनी मंडळ तसेच रतन रंगीला ढोल ताशा मंडळ सहभागी झाले होते. शोभायात्रेत रथ तसेच घोडेस्वार, वासुदेव, पोतराज, वारकरी यांच्यासह कलावंत सहभागी झाले होते. मंमादेवीपासून सुरू झालेल्या या शोभायात्रेत सांस्कृतिक रंगाची उधळण करीत विविध कलावंतांनी आपल्या कला सादर केल्या.

  गळ्यात तंबोरा व डोक्यावर फेटा परिधान करीत पालकमंत्री लोणीकरही वारकर्‍याच्या भूमिकेत पाहावयास मिळाले.  मस्तगड, सुभाष चौक, पाणीवेस, नेहरू रोड मार्गे निघालेल्या या शोभायात्रेचा समारोप शिवाजी महाराज यांच्या पुतळा येथे झाला.

 या शोभायात्रेत जालना महोत्सव समितीचे अध्यक्ष घनश्याम गोयल, स्वागत उपमंत्री वीरेंद्रप्रकाश धोका,  बंडू  मिश्रीकोटकर, भावेश पटेल, ब्रिजमोहन लड्डा, अर्जुन गेही, सुभाषचंद्र देवीदान, गोविंदप्रसाद मुंदडा, नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर, नायब तहसीलदार संदीप ढाकणे तसेच  मनीष तवरावाला, उमेश पंचारिया, सगीर अहेमद, पवन जोशी, हेमंत ठक्कर, डॉ.नीता पंकज जैन, नम्रता श्रीमाळी, रत्नाकर अडशीरे, अशोक अग्रवाल, नारायण पवार, शामलाल लखोटिया यांच्यासह जालना शहरातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या महोत्सवात 22 मे दरम्यान दररोज विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.