Fri, Jul 03, 2020 17:58होमपेज › Jalna › वाळूपट्ट्याच्या लिलावातून वीस कोटींचा महसूल 

वाळूपट्ट्याच्या लिलावातून वीस कोटींचा महसूल 

Published On: May 19 2018 1:31AM | Last Updated: May 18 2018 11:23PMजालना : प्रतिनिधी

जिल्ह्यात 2017 -18 या वर्षात 30 वाळूपट्ट्याच्या लिलावातून शासनाला 19 कोटी 65 लाख 14 हजार 872 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. प्रशासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा हा महसूल जास्त आहे. 
जिल्ह्यात मोठ्यासंख्येने वाळूपट्टे असून, यातून शासनाला चांगले उत्पन्न मिळत आहे. जिल्ह्यात गोदावरी, पूर्णा, गिरजा, धामना या प्रमुख नद्या आहेत. या नदीपात्रातून प्रचंड प्रमाणावर वाळू उपसा केला जात आहे. काही गावांत गावकर्‍यांनी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन वाळू उपश्याला विरोध केल्याने अशा ठिकाणी लिलाव करण्यात आले नाही. बदनापूर तालुक्यातील नानेगाव येथील सुखना नदीच्या पात्रातील वाळू लिलावात 23 लाख 23 हजार 333 रुपये प्राप्त झाले आहेेेत. भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथील गिरजा नदीच्या वाळूपट्ट्यातून 9 लाख 28 हजार 999, जवखेडा ठेांंबरे येथील पुर्णा नदीच्या वाळु पट्टयातुन 13 लाख 79 हजार 638, गव्हाण संगमेश्‍वर येथील पूर्णा नदीच्या वाळूपट्ट्यातून 7 लाख 83 हजार 2, लतीफपूर 8 लाख 79 हजार 270, जाफराबाद तालुक्यातील पिंपळखुंटा 12 लाख, सावंगी 23 लाख 20 हजार 110, निमखेडा बु. 37 लाख 74 हजार 302, भोरखेडा गायकी 6 लाख, कुंभारझरी 18 लाख 1  हजार 942, गोंधनखेडा 17 लाख 77 हजार 777, परतूर तालुक्यातील डोल्हारा 13 लाख 13 हजार 999, बाबुलतारा 24 लाख 91 हजार 200, वझर सरकटे 1 कोटी 6 5लाख 7 7 हजार 862, भुवन 6 कोटी 38 लाख 8 हजार 270, कानडी 1 कोटी 50 लाख 37 हजार 464, उस्वद 2 कोटी 7 लाख 86 हजार 114, सासखेडा 61  लाख 67 हजार 650, इंचा 33 लाख 25 हजार 692, किर्ला  76 लाख 87 हजार 956, दुधा 75 लाख 49 हजार 86, टाकळखोपा 52लाख 51 हजार   540, घनसावंगी तालुक्यातील मुढेगाव 3 लाख 60 हजार, गुंज व हिवरा 2 कोटी 55 लाख 85 हजार 466, दुसर्‍या पट्ट्यातील गुंज व हिवरा 1 कोटी 81 लाख 5 हाजर 274, अंबड तालुक्यात कुरण 1 कोटी 80 लाख,52 हजार 213, गोरी 32 लाख 33 हजार 440, गंधारी 62 लाख 53 हजार 730, परतुर तालुक्यात चांगतपुरी मंहतपुरी 1 कोटी 14 लाख 7 हजार 145, इंदलगाव  22 लाख 87 हजार 490 रुपयांचा महसूल मिळाला आहे.