Fri, Jul 03, 2020 18:55होमपेज › Jalna › जखमी जनावरे मरणासन्न अवस्थेत

जखमी जनावरे मरणासन्न अवस्थेत

Published On: Jun 11 2018 12:40AM | Last Updated: Jun 10 2018 11:48PMभोकरदन : प्रतिनिधी

जालना रस्त्यावर कत्तलखान्याकडे जाणारा जनावरांचा आयशर ट्रक येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडून दिला होता, मात्र या ट्रकमध्ये असलेल्या एकूण 14 जनावरांपैकी  दोन ते तीन जनावरे गंभीर अवस्थेत जखमी झाल्याचे दिसून आले होते. मात्र यातील दोन ते तीन जखमी जनावरांना सरकारी डॉक्टरांकडून उपचार होत नसल्याने ते सध्या शेवटची घटका मोजत आहेत. 

याबाबत माहिती अशी  की, 31 मे रोजी पकडण्यात आलेला ट्रक हा 14 बैलांना कत्तलखान्यात घेऊन जात असताना येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तो पकडून पोलिसांच्या स्वाधीन केला. त्यानंतर आरोपींविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. पकडलेली 14 जनावरे शहरातील गोशाळेत पाठविण्यात आली, मात्र यामध्ये एका तरुण बैलाचा डोळा फुटला होता तर एकाची शेपूट तुटलेली होती आणि एकाच शिंग तुटलेले होते. त्यावेळी जनावरांवर उपचार होणे गरजेचे असताना गोशाळेत येथील सरकारी डॉक्टर वेळोवेळी फोन करूनही उपचार मिळालेले नाहीत. याबाबत पशुसंवर्धन अधिकारी गोटे यांना याबाबत माहिती दिली असता व उपचारासंदर्भात विनंती केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे जनावरांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत तर याला जबाबदार कोण असा प्रश्‍न देखील उपस्थित करण्यात येत आहे. विशेषतः ज्या सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठेपणा दाखवत ही जनावरे पोलिसांच्या ताब्यात दिली व तेही मुक्या जनावरांकडे पाहण्यास तयार नाहीत.