Thu, Jul 09, 2020 02:55होमपेज › Jalna › दोन एकर मेथीमध्ये सोडल्या शेळ्या

दोन एकर मेथीमध्ये सोडल्या शेळ्या

Published On: Mar 11 2018 1:29AM | Last Updated: Mar 11 2018 1:15AMपिंपळगाव रेणुकाई : प्रतिनिधी 

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात मेथीला दर व पाणी नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे. विजय देशमुख या शेतकर्‍याने आपल्या दोन एकर मेथीमधे चक्क शेळ्या सोडल्या.

पिंपळगाव रेणुकाई परिसरात या वर्षी परतीच्या पावसाने हजेरी लावत पिकांना दिलासा दिला असला तरी या पावसामुळे पाणीपातळीत म्हणावी तशी वाढ झालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर दरवर्षी मेथीच्या पिकातून चांगले उत्पन्न घेणार्‍या शेतकर्‍यांना यावर्षी मेथीला योग्य दर व पाणी नसल्याने हजारो रुपयांचा तोटा पत्करावा लागला आहे. विजय देशमुख या शेतकर्‍याने दोन एकर मेथी मोठा खर्च करून लावली, मात्र बाजारात एकीकडे मेथीला भाव नसतानाच दुसरीकडे पाणी नसल्याने मेथी वाळू लागल्याने त्यांनी या शेतात शेळ्या सोडल्या.  

शेतमालाला भाव नसल्यामुळे मेथी लागवडीतून अवघ्या एकवीस दिवसांत येणारे पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या मेथीची लागवड केलेले शेतकरी आज अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.  

दोन एकर शेतात मेथीची लागवड केली होती, परंतु मेथीला भाव नसल्याने काढणी व बाजारात विक्रीपर्यंतचा खर्चही वसूल झाला नाही. त्यातच पाणी नसल्याने मेथी सुकत आहे. त्यामुळे शेतात नाइलाजाने शेळ्यांना सोडावे लागले. - विजय देशमुख, शेतकरी