Fri, Jul 03, 2020 02:40होमपेज › Jalna › जालन्यात कोरोनाचा पहिला बळी

जालन्यात कोरोनाचा पहिला बळी

Last Updated: May 31 2020 10:34AM
जालना : पुढारी वृत्तसेवा

परतूर तालुक्यातील मापेगाव येथील ४५ वर्षीय मयत व्यक्तीचा अहवाल रविवारी सकाळी कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त आला असून कोरोनाचा जालना जिल्ह्यातील हा पहिला बळी ठरला आहे. जालना तालुक्यातील गोलापांगरी येथील एका अंगणवाडी सेविकेचा अहवालही पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुगणाची संख्या १२५ झाली आहे.

मापेगाव येथील रुग्ण हा शुक्रवारी दुपारी न्यूमोनिया आजारावर उपचार घेण्यासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल झाला होता. चिंताजनक प्रकृतीमुळे काल शनिवारी पहाटे दोन वाजता या रुग्णाचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. या मयत रुग्णाच्या लाळेचे नमुने जिल्हा रुग्णालयाने प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. या बाबतचा अहवाल आज रविवारी सकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून मापेगाव येथील रुग्णाच्या मृत्यूमुळे जालना जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. जिल्हा प्रशासन, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि सरकारी यंत्रणेच्या प्रयत्नानंतरही कोरोनामुळे एक बळी गेल्यामुळे जिल्ह्यातील जनतेत एकच खळबळ उडाली आहे.