Fri, Jul 03, 2020 18:35होमपेज › Jalna › सव्वादोन लाख रुपयांची घरफोडी

सव्वादोन लाख रुपयांची घरफोडी

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 07 2018 11:04PMजालना : प्रतिनिधी

बिहारीलाल नगर येथील मधुसूदन रमेशलाल झंवर यांचे घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोकड मिळून सव्वादोन लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी उघडकीस आली.बिहारीलाल नगरातील मधुसूदन झंवर कुटुंबासह 4  मेपासून कर्नाटक येथे देवदर्शनासाठी  गेले होते. सोमवारी घरी परतल्यावर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. 

झंवर यांच्या घराच्या पाठीमागे बांधकाम सुरू आहे. त्या मार्गे चोरट्यांनी पहिल्या मजल्यावर प्रवेश करून बेडरूमचे कुलूप तोडून आत प्रवेश करून चोरट्यांनी दागिने व रोकड लांबविली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रूपेकर हे करीत आहेत.