Fri, Jul 03, 2020 19:25होमपेज › Jalna › भगवाननगरात दरोडेखोरांचा धुमाकूळ

भगवाननगरात दरोडेखोरांचा धुमाकूळ

Published On: May 20 2018 1:42AM | Last Updated: May 20 2018 1:05AMवडीगोद्री : प्रतिनिधी 

भगवाननगर वस्तीवर  गुरुवारी रात्री तीनच्या दरम्यान अज्ञात तीन ते चार चोरट्यांनी  धुमाकूळ घालून तीन ठिकाणी घरफोडी केली. दोन ठिकाणी घरफोटी करण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, या तीन घरफोड्यांत सव्वा लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महाकाळा गावाजवळ असलेल्या काही गावांतील ग्रामस्थ जागे असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी शेतातून धूम ठोकली. 

दि. 17 रोजी जोरदार वादळी वार्‍यामुळे भगवानगर येथे रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होता. अनेक ग्रामस्थ घराला कुलूप लावून छतावर झोपले होते. संधीचा फायदा घेत चुर्मापुरी महाकाळा रोडवर असलेले भगवानगर येथील सुमन भास्कर चाबुकस्वार, रा. भगवाननगर महाकाळा यांच्या दरवाजाखालील  दाहा ते बारा विटा काढून घरात प्रवेश केला. मोबाइल बॉक्समध्ये ठेवलेली 2 हाजार रोख रक्‍कम व कचेच्या बरणीमध्ये ठेवलेली एक सोन्याची अंगठी व सोन्याचे चक्र असा ऐवज लपांस केला.

केशव रघुनाथ माने हे घरावरील गच्चीवर झोपलेले असताना घराचे कुलूप तोडून पंलगाखाली असलेली फायबर सुटकेसमधील सोने-चांदीचे दागिने व सुटकेसमधील रोख 3 हजार रुपये असा ऐवज चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त करून चोरून नेला. रोहिदास पोकळे यांच्या घराचे कुलूप तोडून  देवघरात ठेवलेल्या छोट्या डब्यांमधील सोने-चांदीचे दागिने  व  10 हाजार पये रोख रक्कम असा ऐवज घेऊन पोबारा केला. बबन माने यांच्या घराचे कुलूप तोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. 

या तीन घरांत मिळून सुमारे सव्वा लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. काही घरांमध्ये सामानाची नासधूस करून कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काही तरी आवाज येत आहे हे लक्षात येताच काही लोक खडबडून जागे झाले. तीन ते चार चोरटे हाफपँट व टी शर्ट घातलेले, 20 ते 25 वयोगटांतील सडपातळ मुले असल्याचे भगवाननगर येथील  ग्रामस्थ सांगतात. उसाच्या शेतातून रात्री साडेतीन वाजता हे चोरटे पळून गेल्याचे परिसरातील काही शेतकर्‍यांनी सांगितले.