Mon, Jul 06, 2020 15:21होमपेज › Jalna › सत्तर वर्षांपासून रस्त्याची दुर्दशा, पावसाळ्यात हाल

सत्तर वर्षांपासून रस्त्याची दुर्दशा, पावसाळ्यात हाल

Published On: Aug 06 2018 1:52AM | Last Updated: Aug 08 2018 1:49AMशिरूर कासार : प्रतिनिधी

फुलसांगवी-हाजीपूर या रस्त्याचे अद्याप पक्के काम झाले नसल्याने पावसाळ्यामध्ये हा रास्ता पूर्णपणे चिखलमय होऊन जात आहे. परिणामी थोडा जरी पाऊस झाला तरी हाजीपुरकरांना चिखलाच्या दलदलीमुळे गावाबाहेर पडणे मोठे कठीण होऊन जात आहे. या चिखलामुळे गावातील बस सेवा तर बंद होतेच शिवाय दुचाकी वाहन देखील चालत नाही. हाजीपुरकरांना गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात चिखल तुडवत हाजीपूर ते फुलसांगवी असा पायी प्रवास करण्याची ग्रामस्थांवर दर वर्षीच दुर्दैवी वेळ येत आहे. पाऊस पडल्यानंतर विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शाळेत जावे लागते.

शिरूर कासार तालुक्याच्या पूर्व सीमेवर व सिंदफना नदीच्या तीरावर वसलेले गाव आहे.स्वतंत्र  ग्रामपंचायत असलेले मौजे हाजीपूर हे गाव आहे. या गावकर्‍यांना गावाबाहेर पडण्यासाठी हाजीपूर-फुलसांगवी हा एकमेव रस्ता आहे. या रस्त्यावरून गावकर्‍यांना गावाबाहेर दळणवळण करावे लागत आहे. नेमका हाच दोन कि. मी. अंतर असलेल्या रस्ता  अद्यापही प्रशासकीय पटलावर दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे. वेळो वेळी या रस्त्याचा मुद्दासमोर करत राजकर्त्यांकडून अनेकवेळा अनेक निवडणुका लढवल्या गेल्या आणि निवडणुका संपल्या की त्याकडे जाणीव पूर्वक दूर लक्ष करण्यात आले. 

आजपर्यंत केवळ एकदोन वेळा या रस्त्यावर मुरूम टाकण्या खेरीज साधे खडीकरण किंवा डांबरीकरण होवू शकले नाही. रस्ताप्रश्‍नी हाजीपूर करांचे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.राज्य शासनाबरोबरच केंद्र शासनाच्या ग्रामीण भागातील रस्ता दुरुस्तीसाठी अनेक  योजना  आल्या नी गेल्या  परंतु  या योजना  येथील लोकप्रतिनिधींच्या  व प्रशासकीय अधिकार्‍यांच्या   दुर्लक्षामुळे या रस्त्याचे अद्याप साधे डांबरीकरण होऊ शकले नाही.स्वातंत्र्यानंतरची सातवी दशक पूर्ती  संपत आली, मात्र या रस्त्याची दैना अद्यापही संपलेली नाही. या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनीच्यावतीने करणयात  आली  आहे.