Mon, Jul 06, 2020 09:07होमपेज › Jalna › पशुवैद्यकीय दवाखाना, असून अडचण नसून खोळंबा 

पशुवैद्यकीय दवाखाना, असून अडचण नसून खोळंबा 

Published On: Mar 24 2018 2:13AM | Last Updated: Mar 24 2018 1:33AMतीर्थपुरी : प्रतिनिधी

येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची जीर्ण झालेली इमारत,  अपुर्‍या कर्मचार्‍यांची संख्या यामुळे हा दवाखाना परिसरातील पशु पालकांसाठी असून अडचण नसून खोळंबा या प्रकारात कार्यरत आहे.  

तीर्थपुरीसह  एकूण अकरा गावाच्या कार्यक्षेत्रातील सात हजार पशुधनाच्या  अरोग्याची जबाबदारी पशु वैद्यकीय दवाखान्यातील तीन कर्मचार्‍यांवर आहे. अपुर्‍या कर्मचारी संख्येमुळे हजर असलेल्या कर्मचार्‍यांवर  अधीक कामाचा ताण पडतो.  यामध्ये  एक पशुधन विकास अधिकारी व ड्रेसर व दोन शिपाई असे एकूण चार कर्मचारी कार्यरत आहेत. शिपायाच्या दोन जागा रिक्‍त आहेत.   यामुळे फक्त दोन कर्मचार्‍यावर तीर्थपुरी पशुवैद्यकीय दवाखान्याचे काम चालते.  मुख्यालयाची इमारत देखील मोडकळीस अलेली असून, दुरुस्तीची गरज आहे. कर्मचार्‍यांना राहण्याची व्यवस्था असणारी निवासस्थाने वाईट परिस्थितीत आहेत. तीर्थपुरी  येथे पशुधनविकास मुख्य कार्यालय असल्याने व सर्वांत मोठे गाव असल्याने पशुधनाची संख्या जास्त आहे.यामुळे नियमित एक डॉक्टर उपलब्ध असतो.बाकी दहा गावामध्य लसीकरणासह कर्मचार्‍यांना  नियमित तपासण्या कराव्या लागतात. अकरा गावाचे अतिरिक्त काम फक्त दोनच कर्मचारी करत आहेत . किमान दोन शिपाई तत्काळ उपलब्ध करून द्यावेत असे पत्र देखील जालना जिल्हा परिषदेला देण्यात आलेले आहे, परंतु रिक्त जागा भरलेल्या नाहीत. त्यामुळे अपुर्‍या कर्मचार्‍यांवर पशुधनाची भिस्त आहे.