Fri, Jul 03, 2020 18:56होमपेज › Jalna › भोकरदनचे आरोग्य केंद्र सलाईनवर

भोकरदनचे आरोग्य केंद्र सलाईनवर

Published On: Feb 16 2018 2:30AM | Last Updated: Feb 16 2018 2:15AMभोकरदन : विजय सोनवणे 

तालुक्यातील प्राथमिक ग्रामीण आरोग्य केंद्राची दुरवस्था झाली आहे. कर्मचार्‍यांची रिक्त पदे तसेच निवासस्थाने यामुळे रुग्णालयेच सलाइनवर आहेत. तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 8 उपकेंद्रे आहेत. ग्रामपातळीवर योग्य त्या आरोग्यसेवा पुरवता याव्यात यासाठी 40 उपकेंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत.  राजूर, हसनाबाद, केदारखेडा, जळगाव सपकाळ, आन्वा, सिपोराबाजार, वालसावंगी, धावडा अशा ठिकाणी आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. 

इमारती सुसज्ज असल्यातरी सुविधांची वाणवा आहे. प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय अधिकारी असून आरोग्यसेविका आणि आरोग्यसेवक, शिपाई असे एकून 22 रिक्त पदे आहेत. यात राजूर आरोग्य केंद्रात एक शिपाई, हसनाबाद आरोग्य केंद्रात चार आरोग्यसेविका आणि शिपाई दोन, जळगाव सपकाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात 1 आरोग्यसेविका आणि 1 शिपाई, आन्वा आरोग्य केंद्रात 1 आरोग्यसेवक आणि 2 शिपाई, पिंपळगाव रेणुकाई आरोग्य केंद्रात 1 औषध निर्माण अधिकारी आणि एक शिपाई, वालसावंगी आरोग्य केंद्रात 1 आरोग्यसेवक आणि एक शिपाई, धावडा आरोग्य केंद्रात 2 आरोग्यसेवक आणि 2 शिपाई असे 22 रिक्त पदे आहेत.  चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी आणखी किमान आठ ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असणे गरजेचे आहे. 

अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे महिन्याला प्रसूती होण्याचे प्रमाण अधिक आहे मात्र अनेक ठिकाणी सुविधा नसल्याने त्यांना तालुक्याच्या ठिकाणी यावे लागतात अशाही तक्रारी आहे. 

उपकेंद्र उद्घाटनाअभावी धूळखात
नांजा, फत्तेपूर, इब्राहीमपूर गावात शासनाच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे उद्घाटनाअभावी धूळखात पडूल आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आरोग्य केंद्र उद्घाटनअभावी बंद असल्याने केंद्राची दुरवस्था आहेत.