Mon, Jul 06, 2020 08:02होमपेज › Jalna › ‘पालकमंत्री लोणीकर यांची डिग्री बोगस’

‘पालकमंत्री लोणीकर यांची डिग्री बोगस’

Published On: Mar 15 2018 10:31AM | Last Updated: Mar 20 2018 1:48AMजालना : पुुढारी ऑनलाईन 

पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांची डिग्री बोगस असल्याचा आरोप येथील नागरिक देवचंद पूनमचंद सावरे यांनी केला. या संदर्भात त्यांनी निवडणूक 
आयुक्‍त, राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांकडे तक्रार केली आहे.

2014 विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री लोणीकर यांनी निवडणूक आयुक्‍तांना दिलेल्या उमेदवारी अर्जात यशवंतराव चव्हाण मुक्‍त विद्यापीठाअंतर्गत पदवी प्राप्त केली असल्याचे नमूद आहे.  वास्तविक ते पाचवी पास आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, तसेच त्यांचे विधानसभा सदस्यपद रद्द करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. याबाबत मात्र पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी आरोपात तथ्य नसल्याची प्रतिक्रिया दै.पुढारीशी बोलताना दिली.