Mon, Jul 06, 2020 06:59होमपेज › Jalna › अस्मिता योजना कागदावरच

अस्मिता योजना कागदावरच

Published On: Aug 21 2018 1:35AM | Last Updated: Aug 21 2018 12:29AMभोकरदन : विजय सोनवणे 

 महिला व विद्यार्थिनींना माफक दरात सॅनिटरी नॅपकीन मिळावे, यासाठी शासनाने 8 मार्चपासून अस्मिता योजनेची सुरुवात केली, मात्र तालुक्यात सहा महिन्यांनंतरही  या योजनेची अंमलबजावणी थंडबस्त्यात आहे.  

राज्यातील ग्रामीण भागातील महिला व किशोरवयीन मुली तसेच जिल्हा परिषद शाळांमधील 11 ते 19 या वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकीन व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृती करण्यासाठी तसेच महिला व मुलींना माफक दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्याकरिता राज्यात अस्मिता योजना प्रभावीपणे राबविण्याचा दावा सरकारने केला होता. या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील महिलांना 240 मिमी आकाराची सॅनिटरी नॅपकीन 24 रुपये तसेच 280 मिमी आकाराची सॅनिटरी नॅपकीन 29 रुपयाला देण्याचे जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद शाळांमधील 11 ते 19 वयोगटांमधील किशोरवयीन मुलींसाठी अनुदान तत्त्वावर  आठ नॅपकिन्सचे पॅकेट पाच रुपयाला दिले जाणार होते. पुरवठा करण्याची जबाबदारी बचतगटांना दिल्याचेही अधिकार्‍यांनी सांगितले. यातून बचतगटांना रोजगार मिळणार होता, मात्र जिल्हा परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात ही योजना थंडबस्त्यात दिसून येत असल्याचा आरोप होत आहे.