Thu, Jul 09, 2020 03:07होमपेज › Jalna › एसटी बसने दुचाकीला उडवले

एसटी बसने दुचाकीला उडवले

Published On: Feb 16 2018 2:30AM | Last Updated: Feb 16 2018 2:26AMवडीगोद्री : प्रतिनिधी

अंबड तालुक्यातील वडीगोद्री टीपॉइंटवर जालन्याहून बीडकडे भरधाव शिवशाही बसने रस्ता ओलांडून पलीकडे जाणार्‍या दुचाकीला उडवले. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरुवारी दुपारी 3:30 च्या दरम्यान झाला. 

जालन्याहून बीडकडे जाणारी जळगाव लातूर  शिवशाही  (क्रमांक एमएच-18 बीजी 0870) ने वडीगोद्री टी पॉइंटवर पेट्रोल पंपाकडे जाणार्‍या दुचाकी (क्रमांक एमएच 21 ए वाय 3843) ला धडक दिली. 
या अपघातात राम पंडित तारख  (32) व बळीराम नारायण अंबिलवादे (30, दोघेही  रा. अंतरवाली सराटी) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर  शिवशाही बस न थांबताच निघून गेली, मात्र पोलिसांना फोन केल्यामुळे तिला महाकाळा पाटी येथे अडवले. 

त्यानंतर शहागड चौकीत लावण्यात आली. यावेळी गंभीर जखमीस वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रुग्णवाहिनीने जालन्यातील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. वृत्त लिहीपर्यंत शिवशाही बस चालकाचे नाव कळू शकले नसून पोलिस ठाण्यात कोणतीही फिर्याद दाखल नव्हती. 

अपघातात वाढ
वडीगोद्री टी पॉइंटवर पुलाचे काम चालू असल्याने रस्ता अरुंद असून वळण असल्याने येणारे वाहन दिसत नसल्याने अपघातात वाढ होत चालली आहे.