Fri, Jul 03, 2020 20:05होमपेज › Jalna › ‘त्या’ नराधमांना फाशी द्या

‘त्या’ नराधमांना फाशी द्या

Published On: Apr 18 2018 12:49AM | Last Updated: Apr 18 2018 12:17AMजालना : प्रतिनिधी

देशात होणार्‍या अल्पवयीन मुलींवरील बलात्कार आणि त्यांच्या हत्येच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. नुकताच उन्नाव येथे 8 वर्षांच्या निरागस मुलींवर 3 नराधमांनी सामूहिक बलात्कार करून केलेली अमानुष हत्या ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. उन्नाव आणि कठुआ येथे घडलेल्या घटनांमधील आरोपींना अटक करून त्यांना फाशी देण्यात यावी, अशी  मागणी विविध संघटनांच्या वतीने करण्यात आली. 

शहरात विविध ठिकाणी तीव्र निषेध करण्यात आला. इन्कम टॅक्स कॉलनी येथे सांची बहुउद्देशीय महिला मंडळाच्या वतीने तर सर्वपक्षीयांच्या वतीने गांधी चमन येथे मेणबत्त्या लावून तर भोकरदन येथे कँडल मार्च, बदनापूर येथे निवेदन देऊन निषेध करण्यात आला.

निदर्शनप्रसंगी बलात्कार्‍यांना फाशी झालीच पाहिजे, मुलींच्या जिवाशी खेळू नका, असे विविध फलक हातात घेऊन घोषणा देऊन निषेध करण्यात आला. या वेळी अध्यक्षा लता वाघमारे, सांची वाघमारे, दीक्षा वानखेडे, निशिगंधा मिटकरी, रेवती घनघाव, जयश्री खरात, वैशाली मांटे, स्मिता काजळकर, प्रियंका चव्हाण, कोमल उदावंत, आकांक्षा पवार, नेहा अंबिलवादे, गायत्री उदावंत, सोनाली जोशी, रेखा सोळंके आदींची उपस्थिती होती.

Tags : Jalna news , Unnao, Kathua, event, protest, various organization, minor girl Rape issue,