Mon, Jul 06, 2020 07:58होमपेज › Jalna › गळफास घेऊन दोन तरुणांच्या आत्महत्या

गळफास घेऊन दोन तरुणांच्या आत्महत्या

Published On: Feb 18 2018 1:57AM | Last Updated: Feb 18 2018 1:57AMजालना/परतूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात दोन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या. परतूर तालुक्यातील खांडवीवाडी येथील शनिवार, दि. 17 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. 

अशोक वैजनाथ थिटे (21) असे तरुणाचे नाव आहे. अशोकच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचे समजते. दुपारी अशोक आणि त्याचे वडील दोघे बीडहून दवाखान्यातून आले होते. तेथून वडील बाहेर गेले. घरी कोणीच नसल्याने त्याने पत्र्याच्या पाईपला गळफास घेतला. अशोक थिटे यांच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. 

दुसरी घटना भोकरदन तालुक्यातील आन्वा पाडा येथे घडली. शुक्रवारी  रात्री रंजित बजरंग सिंघल (21) याने जत्रेला जात आहे, असे सांगून तो घराबाहेर पडला. 

त्यानंतर शनिवारी सकाळी चिंचेच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी विजय सिंघल यांच्या फिर्यादीवरून पारध पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास मोरे करीत आहेत.