Mon, Jul 06, 2020 15:44होमपेज › Jalna › जालना : पाझर तलावात पोहायला गेलेल्या दोन तरुणाचा मृत्यु

जालना : पाझर तलावात पोहायला गेलेल्या दोन तरुणाचा मृत्यु

Last Updated: Nov 11 2019 1:32AM
घनसावंगी : प्रतिनिधी

पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील मंगुजळगांव येथे (दि. २८) घडली. ऐन दिवाळी सणादरम्यान ही घटना घडल्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. मंगुजळगांव येथील संदीप रघुनाथ खरात व राम बापुराव कांबळे हे दोन मित्र आज (दि 28 रोजी) राणी उंचेगाव शिवारातील छोट्या पाझर तलावात पोहण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्याता बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहीती मिळाली.

दरम्यान ही घटना दुपारी बारा वाजेच्या दरम्यान घडली असा अंदाज आहे. एक वाजता ही घटना निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी दोघाचेही शव पाझर तलावाबाहेर काढले व त्यांनतर याची माहिती अंबड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र राणी उंचेगाव पाठविण्यात आली. 
ऐन दिवाळी सणातील पाडव्याच्या दिवशीच ही दु:खद घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.