Mon, Jul 06, 2020 16:04होमपेज › Jalna › आयपीएल क्रिकेट सट्टाप्रकरणी दोन बुकी अटकेत

आयपीएल क्रिकेट सट्टाप्रकरणी दोन बुकी अटकेत

Published On: Apr 26 2018 2:01AM | Last Updated: Apr 26 2018 12:02AMजालना : प्रतिनिधी

आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा चालवणार्‍या आणखी दोन बुकींना मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पकडलेे. त्यांच्या ताब्यातून 64 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. दिनेश बनकर व  शेख नदीम शेख नसीर अशी पकडलेल्या बुकींची नावे आहेत.  हा जुगार राजमहेल टॉकीज मागे राहणार्‍या दिनेश बनकर याच्या घरी मुंबई इंडियन्स व हैदराबाद सनरायझर्स यांच्यातील क्रिकेट सामन्यावर जुगार चालत होता. स्थानिक गुन्हा शाखा व सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस पथक क्रिकेट सामन्यावरील जुगार अड्ड्याची माहिती घेत होते. खबर्‍याने त्यांना राजमहेल टॉकीजजवळील दिनेश बनकर याच्या घरात आयपीएल सामन्यावर जुगार खेळला जात असल्याची माहिती दिली. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव राऊत, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे आदींनी छापा टाकून दिनेश बनकर व  शेख नदीम शेख नसिर या दोघांना आयपीएल सामन्यावर जुगार घेताना पकडले. त्यांच्या ताब्यातून टी.व्ही., मोबाईलसह रोख रक्‍कम असा एकूण 64 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्‍त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलिस अधीक्षक लता फड, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने केली.  

Tags : Jalna, Two, bookies, detained,  IPL, Cricket, Matches