Mon, Jul 06, 2020 08:37होमपेज › Jalna › पारंपरिक शेती औजारे नामशेषच्या मार्गावर !

पारंपरिक शेती औजारे नामशेषच्या मार्गावर !

Published On: Apr 27 2018 12:45AM | Last Updated: Apr 26 2018 10:21PMतीर्थपुरी : सतीश केसकर 

यंत्राच्या वापरामुळे शेतीकाम करणार्‍या बैलांचे महत्त्व ग्रामीण भागामध्ये कमी  होत आहे. बहुतांश शेतकरी शेतीकामासाठी आता यांत्रिकी साधनांचा वापर होत असल्याने बैलजोडीचे महत्त्व कमी होत आहे.
कृषिप्रधान देश म्हणून ओळख असलेल्या भारत देशामध्ये शेतीला महत्त्व आहे. परंतु बेभरोशाच्या पावसामुळे बळीराजाने गुडघे टेकल्याचे चित्र आहे. बदलत्या काळानुसार आधुनिक शेती नावारूपाला आली.

शेती क्षेत्राला नवनवीन यांत्रिक साधानसामुग्रीचा वापर होत असल्यामुळे पारंपरिक  औजारे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सर्जा राजाच्या खिल्लारी जोडीचे अस्तित्व धोक्यात आहे. भल्या पहाटे डोक्यावर नांगर व  खांद्यावर घोंगडी  घेऊन सर्जाराजाची जोडी हाकत शेताच्या दिशेने पावले पडत. आता बळीराजा शेतात उभा राहून आधुनिक तंत्राद्वारे होणारी शेती डोळ्यांनी पहात आहे. त्यामुळे शेतामध्ये राबराब राबणारी सर्जा राजाची जोडी हाकताना शेतकर्‍यांच्या मुखातून घुमणारा आवाज दमला आहे.

अत्याधुनिक यंत्राचा आवाज शिवारामध्ये  घुमत आहे. ग्रामीण भागातील व खेड्यातील शेतकर्‍यांनी अत्याधुनिक यंत्रांचा वापर सर्वाधिक वाढला आहे. फाळनांगर, बळीराम, मोगडा, कोळपे लाकडी अवजारे, घोंगडी आदी पारंपरिक साधने दिसेनासी झाली आहेत. वाढलेल्या किंमतीमुळे बळीराजाने बैलाकडे पाठ फिरवली आहे .त्यामुळे शेतात सर्जा राजाच्या जोडीऐवजी ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. त्यामुळे यांत्रिकीकरणावर शेती करण्याकडे शेतकर्‍यांचा कल अधिक वाढला आहे. शेतीच्या मशागतीसाठी व कामासाठी मजुरांची कमतरता प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांना भासत असते. त्यामुळे मोठे ट्रॅक्टर छोटे, पॉवर टॅक्टर,सोयाबीन तूर काढणी यंत्र, हार्वेस्टरसोबतच नवीन येणार्‍या यंत्राचा शेतकरी उपयोग करू लागला आहे. 

Tags : Jalna, Traditional, Farming, Equipment, not, use