Mon, Jul 06, 2020 08:55होमपेज › Jalna › जालना जिल्ह्यात आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह

जालना जिल्ह्यात आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह

Last Updated: May 10 2020 11:18AM

संग्रहित छायाचित्रजालना : पुढारी ऑनलाईन 

जालना जिल्ह्याने कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली असतानाच जिल्ह्यातील अंबड तालुक्यात दोन आणि जालना तालुक्यात एक असे तीन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ वरून ११ वर गेली आहे. यामुळे जिल्हावासियांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

अंबड तालुक्यातील कानडगाव येथील दोन आणि जालना तालुक्यातील जामवाडी येथील एक अशा तीन संशयित रुग्णांनाच्या लाळेचे नमुने जिल्हा रुग्णालयातर्फे ८ मे रोजी प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले होते. सदर तिन्ही रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.