Mon, Jul 06, 2020 07:05होमपेज › Jalna › गणवेशासाठी विशिष्ट दुकान नको

गणवेशासाठी विशिष्ट दुकान नको

Published On: Jun 01 2018 1:59AM | Last Updated: May 31 2018 11:34PMजालना : प्रतिनिधी

पुस्तकांची, गणवेशाची विक्री अथवा शालेय साहित्याची विशिष्ट दुकानांवर घेण्याची सक्‍तीबाबत तक्रार आल्यास सरळ खासगी शाळा बंद करणार असल्याचे शासनाचे निर्देश आहेत. 

यामुळे खासगी शाळांना आता वह्या, पुस्तके विक्री करता येणार नाही. शहरातील काही खासगी प्राथमिक शासकीय मान्यताप्राप्त अनुदानित व विनाअनुदानित व इंग्रजी शाळांची पुस्तके वह्या विक्री करतात. मात्र बालकांच्या मोफत व हक्काच्या कायद्यानुसार याबाबत पालकाला साहित्य आणि गणवेश विक्री अथवा विशिष्ट दुकानाची सक्ती करता येणार नाही अशी तक्रार शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्यास संबंधित शाळा थेट बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

खासगी शाळा चालकांचे धाबे दणाणले आहे. शाळांना सूचना करण्यात आल्या. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार शासन नियमांचे सूचना देखील सर्व खासगी शाळांना देण्यात आल्या आहेत. तसेच विनाअनुदानित शाळांनी पालक व शिक्षक संघ  स्थापन करून फी निश्चित करावी. त्यातही जास्त फी घेण्याचे प्रकार झाल्यास त्यांच्यावर देखील कारवाई होईल. काही खासगी शाळांना अनुदान मिळत असूनदेखील त्या फी वसुली करण्याच्या तक्रारी आहेत.अनेक  शाळांचा आग्रह शालेय साहित्यांची विक्री करणे हे शाळेचे काम नाही. असे प्रकार शाळा करत असेल, तर कारवाई करण्यात येईल. 

कोणतीच शाळा विद्यार्थ्यांना असा आग्रह करू शकत नाही. शाळांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. शाळांच्या माध्यमातून असे नियमबाह्य काम सुरू असेल, तर शाळा बंद करण्याचे आदेशच दिले जातील. अशा तक्रारी नागरिकांनी शासनाकडे दाखल करण्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

पालकांची तक्रार आल्यास कठोर कारवाई

प्राथमिक शाळांनी  पालकांवर शालेय साहित्य खरेदीची सक्ती एखाद्या दुकानावर करू नये. तसेच शाळेत कोणतेही शैक्षणिक साहित्य, वह्या, पुस्तके विक्री करू नये. अशा प्रकारचा शासनाचा अध्यादेश असल्याची माहितीदेखील शाळांना आहे. एखाद्या पालकाची तक्रार आल्यास शासनाच्या धोरणानुसार अत्यंत कठोर कारवाई केली जाईल. कुणाचीही गय केली जाणार नाही.  -बाळासाहेब खरात, गटशिक्षणाधिकारी