Thu, Jul 09, 2020 05:19होमपेज › Jalna › ईव्हीएम मशीन असे पर्यंत सत्तापरिवर्तन नाही : अंधारे

ईव्हीएम मशीन असे पर्यंत सत्तापरिवर्तन नाही : अंधारे

Published On: May 17 2018 1:28AM | Last Updated: May 16 2018 10:52PMआष्टी : प्रतिनिधी

निवडणुकीत जोपर्यंत इव्हीएम मशिन आहे तो पर्यंत सत्तापरिवर्तनाची शक्यता नाही. त्यासाठी इव्हीएम मशिन हटावसाठी आता रस्त्यावर उतरावे लागेल, असे प्रतिपादन प्रा. सुषमा अंधारे यांनी केले. परतूर तालुक्यातील आष्टी येथे गौतम बुद्ध व संभाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती निमित्त व्याख्यान कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी  पूजा वाघमारे होत्या.कार्यक्रमास माया भालशंकर, गंगा सोळंके, पुजा कानडे, लता लोंढे, वाकळे आदीची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अंधारे म्हणाल्या की, भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई, बलात्कार, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, शिक्षण,आरोग्य अशा अनेक समस्या देशात आहेत. देशातील जनता सत्ताधारी पक्षाला कंटाळली असतानाही लोकांना अपेक्षित असलेली माणसे निवडून येताना दिसत नाहीत. कारण हा सगळा घोळ इव्हीएमचा आहे. इव्हीएम हटावसाठी आंदोलन करावे लोकशाही पुनर्जीवित करायची असेल तर यापुढे इव्हीएम मशीन हटावसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. तरच लोकशाही वाचू शकेल. 

कायदा गेला चुलीत

कायदा चुलीपर्यंत पोहोचवायचा होता; पण कायदा चुलीत गेला. कारण महिला फक्त आरक्षणापुरत्या आहेत. अधिकार मात्र पती, सासरे, मुलगा हेच करत आहेत. हीच परिस्थिती सर्वत्र पहावयास मिळते ही मोठी शोकांतिका आहे असेही यावेळी म्हणाल्या .