Mon, Jul 06, 2020 08:57होमपेज › Jalna › चोरीच्या २३ मोटारसायकली जप्त 

चोरीच्या २३ मोटारसायकली जप्त 

Published On: Aug 24 2018 12:43AM | Last Updated: Aug 23 2018 11:30PMजालना : प्रतिनिधी
मोटरसायकल चोरीसह घरफोडी करणार्‍या पाच आरोपींना विशेष कृती दलाच्या पोलिस पथकाने जेरबंद केले. आरोपींच्या ताब्यातून 25 मोटरसायकलींसह एलसीडी, होम थिएटर असा एकूण सहा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विशेष कृती दलाचे पोलिस निरीक्षक यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी आरोपी आनंद शहादेव खुळे (रा.भिवगाव, तालुका देउळगाव राजा), दिगंबर बाबासाहेब किंगर (रा. भोसा, ता. सिंदखेडराजा), बालाजी विजय बरकुले (रा. आष्टी, ता. परतूर) यांना ताब्यात घेतले. यावेळी तीनही आरोपींनी जालना व औरंगाबाद येथून एका वर्षात तब्बल 23 मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. यावेळी पोलिसांच्या तपासात आरोपी बनावट चावीने मोटारसायकल सार्वजनिक ठिकाणाहून चोरून नेत असल्याचे समोर आले. जालना येथे चोरलेली मोटारसायकल औरंगाबाद येथे तर औरंगाबाद येथे चोरलेली मोटारसायकल जालना येथे विक्री करीत होेते. यावेळी आरोपी ओळखीच्या लोकांना विश्‍वासात घेऊन या मोटारसायकली आपल्याच असल्याचे भासवीत. त्या  स्वस्तात विक्री करीत होते. या टोळीने इतर ठिकाणाहूनही मोटारसायकली चोरल्या असाव्यात असा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणात चोरीच्या मोटारसायकल विकत घेणार्‍यांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. 
आरोपींनी चोरलेंल्या विविध पोलिस ठाण्यात या बाबत विचारणा करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलिस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कृती दलाचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, जमादार एम.बी. स्कॉट, रामप्रसाद रंगे, फुलचंद हजारे, नंदकिशोर कामे, संदीप चिंचोले, राजू पवार, श्रीकुमार आडेप, सचिन आर्य यांनी केली.
आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
परतूर तालुक्यातील आष्टी येथील अंगद पंडितराव थोरात व अमोल शिवाजी थोरात यांना विशेष कृती दलाचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी आष्टी येथे एका बंद घरातून सोळा हजार रुपये किमतीचे एलसीडी व होम थिएटर चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून इतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.