Thu, Jul 09, 2020 03:33होमपेज › Jalna › सिंचन विहिरींच्या मुद्यावर सरकारची दुटप्पी भूमिका

सिंचन विहिरींच्या मुद्यावर सरकारची दुटप्पी भूमिका

Published On: May 17 2018 1:28AM | Last Updated: May 16 2018 11:07PMजालना : प्रतिनिधी

सिंचन विहिरीच्या मुद्यावर राज्यातील सरकार दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप जि.प. सदस्यांनी केला. बुधवारी जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा पार पडली. या सभेत शिक्षकांच्या बदल्या, मार्च एंडिंग आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. 

जिल्हा परिषदेची 24 एप्रिल रोजी तहकूब झालेली स्थायी समितीची सभा बुधवार, 16 रोजी घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी अनिरुध्द खोतकर होते. यावेळी उपाध्यक्ष सतीश टोपे यांच्यासह सभापती व सदस्य उपस्थित होते. शिक्षकांच्या बदलीमध्ये जिल्हा परिषदेचे 307 शिक्षक बदलून परजिल्ह्यात गेले आहेत. तेवढे शिक्षक बदलून जिल्ह्यात येणार नसल्याने मोठी पोकळी निर्माण होणार असल्याचा मुद्दा सदस्यांनी मांडला. यावेळी शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात लक्ष देउन कार्यवाही करू, असे आश्‍वासन अनिरुध्द खोतकर यांनी दिले. 

यावेळी खोतकर यांनी जिल्हा परिषदेचा मार्च एंड अद्याप संपलेला नसल्याचे सांगून अधिकार्‍यांनी 27 मे रोजी होणार्‍या सर्वसाधारण सभेपूर्वी आपल्या विभागाचा निधी खर्च करावा अशी सूचना केली. यावेळी जयमंगल जाधव यांनी परतुर तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्तीच्या विहिरींना सत्ताधार्‍यांनी मंजुरी आणली. मात्र अशाच प्रकारे अंंबड व बदनापूर तालुक्यात झालेल्या जास्तीच्या विहिरींना मात्र मंजुरी आणली नाही. त्यामुळे सत्ताधारी दुट्टपी भूमिका घेत असल्याचा आरोप यावेळी केला. विविध विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करण्यात आली.