Mon, Jul 06, 2020 07:01होमपेज › Jalna › शेतकर्‍याने तयार केले मल्चिंग पेपर यंत्र

शेतकर्‍याने तयार केले मल्चिंग पेपर यंत्र

Published On: Apr 23 2018 1:15AM | Last Updated: Apr 23 2018 12:53AMजाफराबाद :  ज्ञानेश्वर पाबळे

भारत हा कृषी प्रधान देश असून महाराष्ट्र राज्य कृषी क्षेत्रात अग्रेसर आहे. येथे दररोज शेती विकसित करण्यासाठी नवनवीन प्रयोग केले जातात. असाच एक अनोखा प्रयोग पिंपळखुटा, ता. जाफराबाद येथील अनिल भालके, विलास भालके, कौतिक भालके या भावडांनी केला. मिरची तसेच अन्य पिकांसाठी लागणार्‍या मल्चिंग पेपर अंथरण्यासाठी  बैलाच्या मदतीने चालणारे यंत्र विकसित केले आहे. या यंत्रामुळे मजुरांची व वेळेची बचत झाली आहे.

भालके बंधुचे शिक्षण जेमतेम आहे. मात्र शेतीत वेगळे प्रयोग राबवून तसेच भरघोस उत्पादन घेणारे शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे. नवीन प्रयोगासाठी ते नेहमीच आग्रही असतात.भालके यांनी तीन एकर शेतीतून एक हजार क्विंटल मिरचीचे उत्पादन घेतले. या उत्पादनाची संपूर्ण तालुक्यात चर्चा आहे. आता त्यांनी नवीन यंत्र तयार करून शेतकर्‍यांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. एक एकर मल्चिंग पेपर अंथरण्यासाठी  5 मजुरांना दोन ते तीन दिवस लागतात. परंतु भालके बंधू यांनी स्वयंचलित तयार केलेल्या या मानवी यंत्रामुळे तिघा मजुरांच्या मदतीने दोन ते अडीच तासांतच एक एकर क्षेत्रावर मल्चिंग पेपर अंथरला जातो. हे मशीन चालविण्यासाठी केवळ तीनच माणसे आणि दोन बैलांची गरज आहे. यंत्र तयार करण्याच्या कामी भालके यांना वेल्डिंग कामात सुदामा म्हस्के यांची मदत झाली.

Tags : Jalna, farmer, created,  Mallching Paper, Equipment