Mon, Jul 06, 2020 07:07होमपेज › Jalna › अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला

अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला

Published On: Apr 17 2018 1:53AM | Last Updated: Apr 17 2018 1:53AMभोकरदन : प्रतिनिधी

लक्ष्मीनगर भागातील चौदा वर्षीय बेपत्ता मुलीचा मृतदेह सोमवारी फत्तेपूर रस्त्यावरील विहिरीत आढळला. यामुळे खळबळ उडाली. अंजली प्रकाश सपकाळ असे मुलीचे नाव आहे. अंजली दोन दिवसांपासून बेपत्ता होती. अंजली मूळची भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील आहे. सध्या मावशीकडे राहात होती. दोन दिवसांपासून ती बेपत्ता झाली होती. यासंदर्भात अंजलीला पळवून नेल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी पोलिसांत दिली होती. 

पोलिस व नातेवाईक तिचा शोध घेत असताना शहराजवळील विहिरीत सोमवारी तिचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वैशाली पवार, रुस्तुम जैवळ, गणेश पायघन व क्षीरसागर यांनी अंजलीचा मृतदेह बाहेर काढला. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे वैद्यकीय अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल.अंजलीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली याविषयी चर्चेला ऊत आला होता.

Tags : Jalna, dead, body, minor, girl,  found