होमपेज › Jalna › वाळूच्या दरात प्रचंड वाढ;व्यावसायिक अडचणीत !

वाळूच्या दरात प्रचंड वाढ;व्यावसायिक अडचणीत !

Published On: Mar 25 2018 1:53AM | Last Updated: Mar 25 2018 1:45AMभोकरदन : प्रतिनिधी

तालुक्यात वाळूचे दर गगनाला भिडल्याने बांधकाम व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणारे बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरसह मिस्त्री, मजूर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. वाळूचे दर गगनाला भिडल्याने एक बंगला बने न्यारा म्हणत स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणारे सुरू असलेले काम बंद करताना दिसत आहेत.

तालुक्यात वाळूचे भाव वाढल्याने शहरी व ग्रामीण भागातील घरबांधणी व दुरुस्तीचे काम करणारे नागरिक अडचणीत सापडले आहेत.  जुन्या घरांची दुरुस्ती करणे गरजेचे असतानाही ते दुरुस्ती करण्यास तयार नाहीत.  काहींनी वाळूला पर्याय म्हणून मातीचा उपयोग सुरू केला आहे.शहरी भागांबरोबर ग्रामीण भागातही इमारतीचे बांधकाम आरसीसीमध्ये करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बांधकामासाठी  लागणार्‍या साहित्यांपैकी सर्वाधिक वापर वाळूचा होतो. बांधकामाला ओढ्याच्या वाळूसह नदीची वाळू  वापरली जाते.

बाधकामासाठी चांगली वाळूही बाहेरून मागवली जाते. काही महिन्यांपूर्वी अतिशय चांगल्या प्रतीच्या वाळूचा दर प्रति पाच ते सहा हजार रुपये टिप्पर होता. सध्या तो दर आठ ते दहा हजारांपर्यंत पोहोचला आहे. वाळू, वीट, सिमेंट बांधकाम मजुराचा खर्च पाहता घर बांधकामासाठी करण्यात आलेले आथिर्र्क बजेट वाळूने कोलमडले आहे. त्यामुळे अनेकांनी  घर बांधकाम थांबवले आहे. ग्रामीण भागाबरोबर शहरी भागांचीही अशीच परिस्थिती आहे. अनेकांचा  उदरनिवार्र्ह या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे मजुरांवर उपासमार आली आहे. 

Tags : Jalna, Jalna News, The construction, business, jammed.