Sun, Sep 27, 2020 03:44होमपेज › Jalna › बदनापूर नगर पंचायतचा कर निर्धारकाला २० हजारांची लाच घेताना पकडले

बदनापूर नगर पंचायतचा कर निर्धारकाला २० हजारांची लाच घेताना पकडले

Last Updated: Feb 24 2020 1:26AM

कर्मचारी गणेश बाबूराव सुरवसेजालना : प्रतिनिधी

बदनापूर येथील नगर पंचायतचा कर निर्धारक गणेश बाबूराव सुरवसे यांना बिअर शॉपीचे नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी २० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. ही कार्यवाही नगर पांचयत कार्यालयात आज करण्यात आली. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी ६ जानेवारी २०२० नगर पंचायत कार्यालयात बिअर शॉपीच्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. त्यावेळी कर्मचारी गणेश बाबूराव सुरवसे यांनी ३५ हजारांची मागणी केली होती. मात्र तडजोडी २० हजार रुपयांवर झाली. पण या कामासाठी पैसांचा तगादा वाढल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना येथे तक्रार दिली. 

अधिक वाचा : नऊ महिन्यांत वीजचोरीची ३६०३ प्रकरणे उघडकीस

याच तक्रारीवरुन आज सुरवसे यांना लाच घेताना पंचासमक्ष लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. गणेश बाबूराव सुरवसे यांच्या विरुध्द लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. 

अधिक वाचा : जालना : चोरीच्या मोटारसायकली विकताना एकास अटक

ही कार्यवाही पोलिस अधिक्षक अरविंद चावरिया, अपर पोलिस अधिक्षक अनिता जमादार, पोलिस उपअधिक्षक रविंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संग्राम ताटे, पोलिस निरीक्षक एस.एस. शेख, कर्मचारी ज्ञानदेव जुंबड, मनोहर खंडागळे, राम मते, अनिल सानप, आत्माराम डोईफोडे, कृष्णा देठे, सचिन राऊत, शिवाजी जमधडे, गजानन कांबळे, गणेश चेके, चालक खंदारे, शेख यांनी केली. 

 "