Mon, Jul 06, 2020 08:16होमपेज › Jalna › उसाचा ट्रक उलटून दोन मुलांचा अंत

उसाचा ट्रक उलटून दोन मुलांचा अंत

Published On: Mar 01 2018 1:40AM | Last Updated: Feb 28 2018 11:39PMवडीगोद्री : प्रतिनिधी

अंबड तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक येथे उसाचा ट्रक उलटून दोन बालकांचा उसाखाली दबून मृत्यू झाला. हा अपघात 28 फेब्रुवारी रोजी  सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडला. गोंदीहून ट्रक (क्रमांक  एमएच-21-जे86) ऊस घेऊन समर्थ सहकारी साखर कारखान्यावर  जात असताना  पाथरवाला बु. येथे चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक उलटला. त्यावेळी सार्थक राजेंद्र थेटे (6) व ओंकार कृष्णा चोरमारे (5) दोघे घराजवळ खेळत होती. उसाच्या ढिगार्‍याखाली दबून त्यांचा मृत्यू झाला. जेसीबीच्या साह्याने उस काढून दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला; परंतु दोघांचाही अंत झाला. ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. ओंकार हा आई-वडिलांना एकुलता एक  होता. तर सार्थक घरात लहान होता. या दुर्दैवी  घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.