Thu, Jul 09, 2020 03:32होमपेज › Jalna › जालना : सतरा वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळली

जालना : सतरा वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळली

Last Updated: Apr 29 2020 9:24PM

संग्रहित छायाचित्रजालना : पुढारी वृत्तसेवा 

जालना जिल्ह्यातील कोरोना संशयित रूग्णांत वाढ होताना दिसत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांत धास्ती पसरलेली आहे. आता भोकरदन तालुक्यातील पारध येथील एका सतरा वर्षीय मुलीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मोठी धास्ती पसरली आहे. 

पारध येथील ही सतरा वर्षीय तरुणी (दि.२७ एप्रिल रोजी) जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. या तरुणीच्या लाळेचे नमुने प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले होते. आज बुधवारी सायंकाळी प्रयोग शाळेकडून या तरुणीचा अहवाल प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जालना वासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.