Thu, Jul 09, 2020 03:40होमपेज › Jalna › संत नरहरी महाराजांचा जयघोष

संत नरहरी महाराजांचा जयघोष

Published On: Aug 25 2018 1:13AM | Last Updated: Aug 25 2018 12:12AMभोकरदन : प्रतिनिधी

शहरात संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील सराफा गल्ली परिसरातून टाळ मृदंगाच्या गजरात आणि जय नरहरीच्या महाराजांच्या जयघोषात  मिरवणूक काढण्यात आली.

भोकरदन तालुका सराफ असोसिएशन व संत नरहरी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने महाराजांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्या जाते. 
दरम्यान समारोपाच्या कार्यक्रमा प्रसंगी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा कार्यक्रमात आ.संतोष दानवे व इतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार संतोष दानवे, माउली वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.रामेश्‍वर महाराज, नगराध्यक्षा मंजूषा देशमुख, राजाभाऊ देशमुख, ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे अध्यक्ष मोहन हिवरकर, राज्य सुवर्णकार महामंडळाचे उपाध्यक्ष अशोक वारेगावकर, किशोर पडवळे, गाडी लोहार समाजाचे नेते एस.के.पोपळघट, संजय सराफ, अनंत पडवळे, भास्कर टेहरे, महेश दुसाने, जगन्नाथ विसपुते, सूर्यप्रकाश उदावंत, दीपक पळसकर, बळीराम गोफणे, राजू खुणे, प्रभाकर शहागडकर, महेश दुसाने आदी उपस्थित होते. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.