Mon, Jul 06, 2020 07:22होमपेज › Jalna › आरक्षणाचा वापर राजकीय गोष्टींसाठी : राज ठाकरे 

आरक्षणाचा वापर राजकीय गोष्टींसाठी : राज ठाकरे 

Published On: Jul 23 2018 1:14AM | Last Updated: Jul 23 2018 12:06AMजालना : प्रतिनिधी

राजकीय पक्ष आरक्षणाचा वापर करत आहेत. या विषयावर मुख्यमंत्र्यांपासून सर्वजण मूर्ख बनवीत आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

गुरू गणेश सभागृहात आयोजित मनसे कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ठाकरे म्हणाले की, पावसाळ्यापूर्वी पावशा पक्षी शेतकर्‍यांना पेरते व्हा म्हणतो. तेच काम निवडणुकीपूर्वी तुम्हाला जागे करण्यासाठी आलो आहे. निवडणुका आल्या की मूलभूत प्रश्‍नांवरून सर्वसामान्यांचे लक्ष इतरत्र वेधण्यासाठी राममंदिरासारखे विषय समोर करून धर्मा-धमार्र्ंत फूट पाडली जाते. आज खासगी शिक्षण व उद्योग क्षेत्रात आरक्षण नाही. सरकारी क्षेत्रात आरक्षण मिळूनही किती जण नोकरीस लागणार हा संशोधनाचा प्रश्‍न आहे. त्यामुळे दलित व मराठा समाजातील तरुणांनी आरक्षणाबाबत नीट विचार करावा. 

जालन्याचे नाव ‘याल ना’?

जालना शहरात पाण्यासह विविध समस्या असल्याने जालना शहराचे नाव हे जालनाऐवजी याल ना, असे हवे होते. शहरातील तरुणांना पाण्यासह इतर प्रश्‍नांचे काहीच वाटत नाही का, असा प्रश्‍नही ठाकरे यांनी या वेळी तरुणांना विचारला. पैठण हे एकेकाळी राजधानीचे गाव होते, मात्र आज या गावाची अवस्था काय आहे. येथील पैठणीने जगभरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, मात्र आज हे शहर उपेक्षित असल्याची खंत ठाकरे यांनी व्यक्त केली. 

पाणीप्रश्‍न 15 वर्षांपासून जैसे थे

जालना शहराचा पाणीप्रश्‍न गेल्या पंधरा वषार्र्ंपासून जैसे थे आहे. शहरात पंधरा दिवसांआड पाणी येते. याचा विचार तरुणांनी केला पाहिजे. आज आपल्या मागून येऊन अनेक देश पुढे जात आहे. कोणीही येऊन तुम्हाला मूर्ख बनवितो. ज्या तरुणांना काही करावयाचे अशा तरुणांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना संधी देण्यास तयार आहे.

जीएसटी वाढवून पुन्हा कमी केला!

जालना : केंद्र व राज्यातील भाजप सरकार हे अनेक बाबतीत खोटे बोलून दिशाभूल करीत असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. ठाकरे म्हणाले की, देशात राहुल गांधीनंतर बहुमतात आलेले पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे एकमेव सरकार होते. या सरकारने चार वर्षे कामे करण्याऐवजी नोटाबंदी, जीएसटी, योग, स्वच्छ भारत अभियान या सारख्या गोष्टीत वेळ घालवला. जीएसटी वाढविल्यानंतर आता कमी करण्यात आला. देशात काय चाललेय व कशासाठी चाललेय हे कोणालाही कळत नाही. केंद्रातील अविश्‍वास प्रस्तावाच्या वेळेस शिवसेनेत वैचारिक गोंधळ असल्याचे समोर आल्याची टीका ठाकरे यांनी केली. 

अविश्‍वासाच्या चर्चेत काँगे्रस अध्यक्ष राहुल गांधी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आलिंगन देण्यावर बोलताना ठाकरे म्हणाले की, पंतप्रधानांनी अशा मिठ्या अनेकांना मारल्या आहेत. राज्यात मुख्यमंत्री 1 लाख 20 हजार विहिरी बांधल्याचे सांगत आहेत. तरीही पाणीप्रश्‍न कायम आहे. देशात व राज्यात स्वच्छता अभियान राबविले गेले. घराघरात शौचालय बांधल्याचा दावा मुख्यमंत्री करीत आहेत. शौचालयासाठी पाणी व वीज लागते. जर तेच नसेल तर मग कशाला बांधताय शौचालय, असा प्रश्‍न ठाकरे यांनी केला. पंढरपूरच्या विठ्ठलावर संपूर्ण महाराष्ट्राची श्रध्दा आहे. पांडुरंगाच्या पूजेला विरोध  होत असेल तर त्यात विठ्ठलाचा काय दोष असे राज ठाकरे म्हणाले.

माथी भडकावून राजकीय हेतू साध्य ः देशात व राज्यात बहुतेक शिक्षण संस्था व उद्योग खासगी आहेत. सरकारी क्षेत्रात केवळ दोन ते तीन टक्के आरक्षण आहे. त्यातून आरक्षण मागणार्‍यांना किती टक्के आरक्षण मिळणार हे माहिती नाही. आरक्षणाच्या विषयावर  मुख्यमंत्री खोटे बोलत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. प्रत्येक प्रश्‍नाच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. केवळ माथी भडकवून राजकीय हेतू साध्य होईल. हेडलाइनही मिळतील. मात्र त्यातून काहीच साध्य होणार नाही. माझ्याशिवाय महाराष्ट्रात आज थेट बोलणारा एकही नेता नाही, असेही ठाकरे म्हणाले. इस्रोच्या रिपोर्टनुसार राजस्थाननंतर महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे.