Fri, Jul 03, 2020 19:13होमपेज › Jalna › तलावांची तत्काळ दुरुस्ती करा

तलावांची तत्काळ दुरुस्ती करा

Published On: May 25 2018 1:09AM | Last Updated: May 24 2018 11:17PMजालना : प्रतिनिधी

पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व लघु व मध्यम प्रकल्प तसेच साठवण तलावांची दुरुस्ती करावी, जेणेकरून अति पाऊस पडल्यास तलाव फुटणार नाही अथवा काही धोका होणार नाही याची लघु पाटबंधारे विभागाने घेण्याची सूचना प्रभारी जिल्हाधिकारी  पी.बी. खपले यांनी दिले.

पाटबंधारे विभाग व लघु पाटबंधारे विभागने तत्काळ पूर रेषा आखणीचे काम करून अहवाल सादर करावा. तालुका व गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा तहसीलदारांनी तयार करुन 31 मे पूर्वी माहिती सादर करावी. यात्रा नियोजन आराखडा सादर करावा असे निर्देश अपर जिल्हाधिकारी पी.बी.खपले यांनी दिले. मंगळवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख यांची मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली.

सर्व तहसीलदारांनी  पूर परिस्थितीत जनतेला स्थलांरित करण्याची वेळ आली तर त्यासाठी मोठे हॉल, शाळा आदी सुनिश्चित करून ठेवावी. त्या ठिकाणी खाण्या-पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासंदर्भात नियोजन करावे. कार्यकारी अभियंता (ल.पा.विभाग) यांनी पूर आपत्ती व्यवस्थापन आराखडा व उपाययोजना तयार करून 21 मे पूर्वी सादर कराव्यात. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच इतर विभागप्रमुख त्याअंतर्गत येणार्‍या विभागांची मान्सूनपूर्व तयारीची आढावा बैठक 31 मेपूर्वी घ्यावी व उपाययोजना कराव्यात. तालुका व गाव आपत्ती व्यवस्थापन समिती गठीत करावी. सर्व संबंधित विभाग पोलिस, तहसील, कृषी,पाटबंधरे, बांधकाम, वाहतूक, आरोग्यप्रमुखांनी त्यांच्या स्तरावर 1 जूनपासून नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यान्वित करावा.