Sat, Oct 31, 2020 13:58होमपेज › Jalna › मंदिरे दिवाळीनंतर उघडणार?

मंदिरे दिवाळीनंतर उघडणार?

Last Updated: Oct 27 2020 1:35AM
जालना ः पुढारी वृत्तसेवा

राज्यातील मंदिरे दिवाळीनंतर उघडली जाण्याची शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी व्यक्‍त केली. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेतील, असे ते म्हणाले. 
राज्यातील मंदिरे उघडण्याची सातत्याने मागणी होत आहे. राज्य शासनही त्यासाठी सकारात्मक आहे.

मात्र, घाईगडबडीने निर्णय घेऊन चालणार नाही. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी घाईघाईने कोणताही निर्णय घेता येणार नाही, असेही ते म्हणाले.
 

 "