Mon, Jul 06, 2020 07:40होमपेज › Jalna › शहरात पावसाळापूर्व नालेसफाई 

शहरात पावसाळापूर्व नालेसफाई 

Published On: May 27 2018 1:18AM | Last Updated: May 27 2018 12:04AMभोकरदन : प्रतिनिधी

मे महिना उलटत येत असला तरी नगरपालिकेने नाले सफाईचे काम हाती घेतले नव्हते. दै. पुढारीत वृत्त प्रकाशित होताच पालिकेने शहरात नालेसफाई मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी नाले सफाई कामास प्रारंभ झाला. त्यामुळे शहरातील नागरीकातून दै.पुढारीचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

शहरात 17 वॉर्ड आहेत. नगर पालिकेत 17 नगरसेवक असून शहराची धुरा काँग्रेसच्या महिला नगराध्यक्षा मंजूषा देशमुख यांच्याकडे आहे. मात्र सद्य:स्थितीत अधिकारी, पदाधिकार्‍यांना शहरातील समस्यांचे काहीच घेणे-देणे नसल्याचे वास्तव आहे. शहरात सिमेंट रस्ते तर आहेत. मात्र त्याची काही दिवसांतच वाट लागून गेली. त्याला भेगा पडल्या आहेत. कुठे मोठाले खड्डे पडले आहे. काही ठिकाणी सिमेंट रस्ता आहे की नाही, ही स्थिती आहे. येथील 17 वॉर्डांचा आढावा घेतल्यानंतर अनेक दिवसांपासून नाल्यांची साफसफाई झाली नसल्याचे दिसून आले. काही ठिकाणी नाल्या तुंबलेल्या आहेत. त्यातील घाण पाणी रस्त्यावर पसरले होते. काही ठिकाणा नाल्या पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे घाणपाणी थेट नागरिकांच्या घरात शिरते होते.  काही रिकाम्या भूखंडावर जमा होते. डासांचे प्रमाण वाढल्यामुळे रोगराई वाढ होण्याची शक्यता होती. 

काही ठिकाणी डुकरांनी आपले बस्तान मांडल्यामुळे आजाराची शक्यता बळावली आहे. पदाधिकारी, अधिकारी या समस्यांकडे दुर्लक्ष करून आपल्याला काहीच घेणे-देणे नसल्याची भूमिका घेतात. शहरातील बहुतांश पथदिवे मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. अनेक ठिकाणी कचर्‍याचे ढीग आहेत. कचरा तसाच पडून असतो.  अधिकारी, पदाधिकार्‍यांना जनतेने काहीच देणे घेणे नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न बिकट बनत आहे. समस्या वाढत आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने दै.पुढारीने वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर पथदिवे, नालेसफाई, स्वच्छता सुरू झाल्याने शहरातील नागरिकांतून दै.पुढारीचे आभार मानण्यात येत आहेत.