Fri, Jul 03, 2020 18:40होमपेज › Jalna › वडीगोद्री परिसरात पावसाचे थैमान, मांगणी नदीला पूर 

जालना : वडीगोद्रीत पावसाचे थैमान, मांगणी नदीला पूर 

Last Updated: Nov 11 2019 1:32AM

मांगणी नदीला आलेला पूर वडीगोद्री (जालना) : प्रतिनिधी

वडीगोद्री आणि गोंदी - शहागड परिसरात परतीच्या पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. या पावसाने मांगणी नदी आणि चांदसुरा नाल्याला मोठा पूर आला असून तेथील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. याशिवाय काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहनांची वाहतूक बंद झाली आहे.

या भागात रात्री विजेच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे मांगणी नदीला पूर आला असून नदीकाठची सर्व शेती पाण्यात गेली आहे. तर गोंदी- शहागड रोडवर मांगणीच्या पुलावरून पाणी ओसंडून वाहत आहे. तर  सकाळी ९ वाजल्यापासून गोंदी- शहागड रोडवरील सर्व वाहनांची रहदारी बंद करण्यात आली. याशिवाय गोंदी आणि पाथरवा या गावांचा संपर्क तुटला आहे.

चांदसुरा नाल्याला पाणी, शहागड -पैठण रोड बंद

शहागड -पैठण रोडवरील जिनिंग जवळील चांदसुरा नाल्याला पूर आला असून पुलावरून पाणी खळखळ वाहत आहे. गोरी, गंधारी, डोमलगाव, साष्टपिंपळगाव, आपेगाव, बळेगाव या गावाचा संपर्क तुटला आहे. तर या मार्गावरिल सर्व रहदारी बंद करण्यात आली आहे.