Sun, Jul 12, 2020 14:21होमपेज › Jalna › आर.सी. बाफना ज्वेलर्सचे ८० कॉम्प्यूटर हॅक

आर.सी. बाफना ज्वेलर्सचे ८० कॉम्प्यूटर हॅक

Last Updated: Nov 28 2019 7:14PM

संग्रहित फोटोजळगाव : प्रतिनिधी

शहरातील सुप्रसिद्ध आर.सी.बाफना ज्वेलर्सच्या जळगाव मुख्यालयातील ८० कॉम्प्युटर हॅकर्सने हॅक करून ९८० डॉलर्स म्हणजेच ६० लाख रुपयांची खंडणीस्वरूप मागणी केली आहे. त्याविरोधात शनीपेठ पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

शहरातील अग्रगण्या गणले जाणारे आर.सी. बाफना ज्वेलर्सचा महत्वाचा डेटा अज्ञात हॅकर्सने हॅक केला. दरम्यान, या प्रकरणी आर.सी. बाफना ज्वेलर्सच्या प्रशासनाने शनीपेठ येथे जावून रितसर तक्रार दाखल केले आहे.

हा डाटा झाला हॅक...  

बिलिंग सॉफ्टवेअर, ग्राहकाचे तपशील, व्यवहाराचा तपशील, टॅली ईआरपी – एसी विभाग आणि याबरोबर कूटबद्ध (Encrypt) झालेल्या डाटाच्या एका फोल्डरमध्ये खंडणीची मागणी करणारी एक नोट पॅड फाईल देखील आढळून आली आहे. त्यामुळे डाटा चोरी झाल्याचा संशय असून त्याचा दुरुपयोग होऊ नये, यासाठी अज्ञात हॅकरच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.