Mon, Jul 06, 2020 15:14होमपेज › Jalna › दुचाकीला प्रतिकिलोमीटरसाठी लागताहेत १ रुपया ७४ पैसे

दुचाकीला प्रतिकिलोमीटरसाठी लागताहेत १ रुपया ७४ पैसे

Published On: May 31 2018 1:36AM | Last Updated: May 30 2018 11:07PMजालना : प्रतिनिधी

मे महिन्यांच्या 14 तारखेपासून दर दिवसाला 15 ते 20 पैशांनी पेट्रोलची दरवाढ होत आहे. 14  मे रोजी 83 रुपये 60 पैसे प्रतिलिटर असलेले पेट्रोलचे दर बुधवारी 87  रुपये 13 पैसे होते. अवघ्या 16 दिवसांत जालन्यात पेट्रोल 3 रुपये 53 पैशांनी वाढले असून त्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. दुचाकीचालकाला एका किलोमीटरसाठी तब्बल 1 रुपया 74 पैसे मोजावे लागत असल्याने अनेकांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे.

कर्नाटक विधानसभेच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे 14 मेपासून पेट्रोलच्या दरात वाढ सुरू झाली. त्या अगोदर चार दिवस पेट्रोलचे दर 83.38 वर स्थिर होते. 14 तारखेला हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पेट्रोलचे दर 22 पैसे वाढून 83.60 झाले. त्यानंतर ही वाढ सलग होत आहे. गेल्या वर्षी 16 जूनपासून दररोज पेट्रोलचे दर बदलण्यास सुरुवात झाली. दररोजची दरवाढ होण्याच्या धोरणाची अंमलबजावणी देशातील प्रमुख शहरांमध्येच होती.

राऊंड फिगरवर भर

ग्राहकांनी लिटरप्रमाणे पेट्रोल भरण्याचे प्रमाण कमी होऊन 50, 100, 200 किंवा 500 रुपयांचे पेट्रोल भरण्याकडे वळले आहे. यात प्रतिलिटर 50 कि.मी.चे दुचाकीचे आव्हरेज असून एक किलोमीटरला जवळपास एक रूपये 74 वाहनचालकांना मोजावे लागत आहे. कधी 14  पैसे तर कधी 17 पैसे दररोज होणारी ही दरवाढ  एकदम जाणवत नसली तरी प्रत्यक्षात वाहनाच्या पेट्रोल टँकमध्ये पडणार्‍या पेट्रोलमध्ये कपात होत आहे.