Mon, Jul 13, 2020 17:46होमपेज › Jalna › जालना : चोरीच्या मोटारसायकली विकताना एकास अटक

जालना : चोरीच्या मोटारसायकली विकताना एकास अटक

Last Updated: Jan 22 2020 2:10AM
जालना : प्रतिनिधी 

नाशिकमध्ये चोरीच्या मोटारसायकली विकताना एका चोरट्याला जेरबंद करण्यात यश आले. स्थानिक पोलिस पथकाने ही कारवाई केली. यात सुमारे ९० हजाराच्या चार मोटारसायकली जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. जुन्या जालन्यातील मिलन चौकात सापळा रचून कारवाई करण्यात आली.  

अधिक वाचा : अखेर शरद पवारांच्या फोननंतर पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवडीची घोषणा

या कारवाईत पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, सहायक फौजदार एम.बी. स्कॉट, रामप्रसाद रंगे, नंदकिशोर कामे, संदीप चिंचोले, राजू पवार, गजू भोसले, श्रीकुमार आडेप, आकाश कुरील, दीपक अंभोरे यांनी काम पाहिले. 

अधिक वाचा : भाजप जिल्हाध्यक्ष निवडीवेळी महाजन, दानवेंसमोरच राडा