Thu, Jul 09, 2020 03:29होमपेज › Jalna › जिल्ह्यातील 44 शाळांना ठेंगा

जिल्ह्यातील 44 शाळांना ठेंगा

Published On: Apr 12 2018 1:21AM | Last Updated: Apr 11 2018 11:10PMजालना : प्रतिनिधी

जिल्ह्यात शासनाच्या वतीने 83 विना अनुदानित शाळांपैकी 2018 मध्ये 39 शाळांनाच 20 टक्केच अनुदान मिळणार आहे. त्यामुळे 44 शाळांना शासनाने ठेंगा दाखवल्याचे पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यात 391 माध्यमिक शाळा आहेत. या शाळांपैकी 182 शाळा अनुदानित तर 83 शाळा विनाअनुदानित आहेत. 83 अनुदानित शाळांपैकी 33 शाळा या जिल्हा परिषदेच्या आहेत, तर 44 विनाअनुदानित शाळांना अद्याप कोणतेही शासकीय अनुदान न मिळाल्याने या शाळा अनुदानापासून वंचित राहिल्या आहेत. जिल्ह्यात इंग्रजी शाळा या कायम विनाअनुदानित असून, या शाळांची संख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे.

शहरी व ग्रामीण भागात इंग्रजी शिक्षणाचे पेव मोठ्या प्रमाणावर फुटले. या शाळेत प्रवेश देण्यासाठी पालक मोठी फीस देऊन पाल्यांना प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळेच जिल्ह्यात कायम विनाअनुदानित असतानाही या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या  प्राथमिक विभागाच्या 331 शाळा असून, त्यात 84 शाळा अनुदानित, 51 विनाअनुदानित, 78 कायम विनाअनुदानित तर 110 स्वयं अनुदानित शाळा आहेत. त्यापैकी 113 शाळा मराठी माध्यमाच्या, 4  शाळा हिंदी माध्यमाच्या, 52 शाळा उर्दू माध्यमाच्या, 155 शाळा या इंग्रजी माध्यमाच्या, 6 शाळा हिंदी व मराठी माध्यमांच्या आहेत. 2014 मध्ये 20 टक्के अनुदान शाळांंंना देण्यात आले होते.

त्यानंतर अनुदानाच्या संख्येत वाढ झाली नाही. अनुदानित शाळा, विनाअनुदानित शाळा व कायम विनाअनुदानित शाळेच्या चक्‍करमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मूल्यमापनाकडे दुर्लक्ष होत आहे. ग्रामीण भागाात तर सातवीच्या विद्यार्थ्यांना स्वतःचे नाव इंग्रजीत लिहिता येत नाही. अनेक मुले भागाकार व गुणाकारात कच्ची आहेत. एकीकडे संस्थाचालक व शिक्षक आपल्या हक्‍कांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी पुढाकार घेत असतानाच दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या खालवत जाणार्‍या शैक्षणिक दर्जा सुधारण्याबाबत मात्र आग्रही दिसत नाही. 

Tags :  Jalna, subsidy, 44, schools, district