Sun, Sep 20, 2020 03:12होमपेज › Jalna › जालना : अंबड नगर परिषदेत मुख्याधिकारी यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव पारित

जालना : अंबड नगर परिषदेत मुख्याधिकारी यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव पारित

Last Updated: Sep 05 2020 1:13AM

अंबड नगर परिषदअंबड (जालना) : पुढारी वृत्तसेवा

अंबड नगर परिषदेची झूम अँपद्वारे सर्वसाधारण बैठक संपन्न झाली. यावेळी अंबड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या मनमानी कारभारा बाबत चर्चा झाली. ज्यामध्ये नगर परिषदेच्या मालकीची असलेली फायर ब्रिगेडची स्क्रँप झालेली गाडी ठराव न घेता व शासनाच्या आदेशाचे पालन न करता मुख्याधिकारी यांनी परस्पर विक्री केली.

यावेळी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांच्यासह सर्व सभागृहातील सदस्य यांनी त्याबाबत तक्रार दाखल केली होती. परंतु मुख्याधिकारी यांनी सभागृहासमोर आपले म्हणणे तर मांडले नाहीच, परंतु प्रसारमाध्यमांना मी घेतलेला निर्णय कसा योग्य असल्याचे सांगितले. तसेच मुख्याधिकारी यांनी आजपर्यंत सभागृहाला कुठलाही खुलासा दिला नाही. परंतु याउलट इंन्शुरन्स कंपनीला स्टॅाप पेमेंटचे पत्र काढले. अशा प्रकारची मुख्याधिकारी यांची वागणूक असल्या कारणाने नगर परिषदेला आर्थिक हानी पोहोचत आहे. ते कायद्याची उल्लघन करणारेआहे, असा आरोप करीत अविश्वास ठराव मांडला व तो एकमताने मंजूर करण्यात आला.

सॅनिटायझरच्या भडक्याने महिलेचा मृत्यू

अविश्वास ठरावात मुख्याधिकारी हे नगर परिषदेचे कोणत्याही प्रकारचे मानधन देता वेळी फॉर्म क्र.६४ वर अध्यक्षाची स्वाक्षरी बंधनकारक असताना विना परवानगी व अध्यक्षाच्या स्वाक्षरीच्या धनादेशाचे वाटप मुख्याधिकारी यांनी परस्पर बनावटी स्वाक्षऱ्या करून एजन्सी यांच्याशी संगमत करून धनाद्श काढले.

शासनच्या अत्यंत महत्वकांक्षी योजना पंतप्रधान आवास योजना व रमाई आवास योजना या योजना सर्व गरीब समाजाला आपल्या हक्काच घर देणारी योजना आहे, परंतु अंबड नगर परिषदेमध्ये पंतप्रधान आवास योजनेतील १०५६ प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. परंतु एक  वर्षाच्या काळामध्ये केवळ २५५ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या सर्व धीम्या गती कारभाराला मुख्याधिकारी जबाबदार आहेत. तसेच अनेक लाभार्थी कामास सुरवात करूनही या योजनेपासून वंचीत आहेत. या सर्व गोष्टींना मुख्याधिकारी यांचा अकार्यक्षम स्वभाव जबाबदार आहे.

नाशिक : जिल्ह्यात 219 बाधित, तर 434 कोरोनामुक्‍त

नगर परिषदेचे पाणी पुरवठ्याचे तांत्रिक कर्मचारी सतीश सोळुंके याना लिपिक स्वरूपाच्या कामाचा पदभार कोणत्याही सभागृहाची, अध्यक्षाची परवानगी न घेता दिला यामुळे अंबड शहरातील पाणीपुरवठा असुरळीत झाला. नगर परिषदेने मागील सभेत पाणी पुरवठा वितरणा करीता असेल ते कंत्राटी कर्मचारी यांना ई- टेंडर काढून काम करण्याची परवानगी दिलेली असताना अचानक सभागृहाच्या आदेशाचे पालन न करता मनमानी पद्धतीने कंत्राटी कर्मचाऱ्यास कामावरून कमी केले ज्यामुळे सुरळीत चालू असलेला कारभार असुरळीत झाला. मुख्याधिकारी यांचा कारभार 'हम बोले सो कायदा' या प्रकारचा झाला आहे. अध्यक्ष व सभागृहाला कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता मुख्याधिकारी हे काम करतात. ज्याने दैनदिन कारभार करणे कठीण होत आहे. त्यामुळे शहराचा विकास व प्रस्तावित विकास कामे करणे अशक्य झाले आहे.          

मुख्याधिकारी हे यांना फोन केल्यास ते उचलत नाहीत. त्यामुळे जनतेच्या समस्या सोडवल्या जात नाहीत. सदस्यांकडे जनतेने तक्रार केल्यास मुख्याधिकारी हे सदस्यांचे देखील फोन घेत नाहीत. ज्यामुळे अध्यक्ष व सदस्य यांना काम करणे कठीण झाले आहे. त्यामुळे सभागृहातील सर्वपक्षीय सदस्यांनी झूम अँपद्वारे हात वर करून व लेटर हेड वर लिहून मुख्याधिकारी यांच्यावर आमचा विश्वास राहिलेला नाही म्हणून अविश्वास ठराव एकमताने मंजूर व पारित केला आहे. तसेच हा ठराव शासन दरबारी व वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करण्याकरीता अध्यक्षांकडे हे सभागृह अधिकार देत असल्याचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी म्हटले आहे.  

 "