Mon, Jul 06, 2020 08:53होमपेज › Jalna › नांदेडच्या इम्रानला ‘मराठवाडा श्री’चा बहुमान  

नांदेडच्या इम्रानला ‘मराठवाडा श्री’चा बहुमान  

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 10 2018 11:58PMजालना : प्रतिनिधी 

माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला ‘एमपी मराठवाडा श्री’चे सामने आझाद मैदानावर घेण्यात आले. अंतिम स्पर्धेत नांदेडचा पहिला एमपी मराठवाडा 2018 चा मानकरी इम्रान शेख ठरला. 
बॉडी बिल्डींग स्पर्धेचे उद्घाटन माजी आ. कैलास गोरंट्याल व अक्षय गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोरंट्याल म्हणाले, की, आजची तरुणाई फेसबुकमध्ये दंग आहे. सततच्या टि.व्ही मोबाईलमुळे तरूण- तरूणी व्यस्त दिसत आहेत. त्यामुळे युवकांनी हेल्थ कल्ब मध्ये वेळ देवून शरीर तंदरूस्त करावे. यातुन जिल्हास्तरिय राज्यस्तरीय खेळाडु घडत असतात. प्रास्ताविक समाजसेवक असलम कुरेशी यांनी केले. तर आभार प्रदर्शन बॉडी बिल्डींग चे शहराध्यक्ष अल्ताफ कुरेशी यांनी केले. 

या स्पर्धेसाठी 74 संघानी सहभाग घेतला होता. अंतीम स्पर्धेत नांदेड येथील संघाचा एमपी मराठवाडा 2018 चा पहिला मानकरी इम्रान शेख ठरला तर दुसरा प्रदिप सरगम आणि तिसारा जमीर शेख हे विजयी ठरले.यावेळी या एमपी मराठावाडा स्पर्धेसाठी महेमूद पहेलवान, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, बॉडी बिल्डींग असो. जिल्हाध्यक्ष महावीर ढक्का, शहराध्यक्ष अलताफ कुरेशी, समाजसेवक असलम कुरेशी, काँग्रेस शहराध्यक्ष शेख महेमूद, राम सावंत, खालेद कुरेशी, मुस्ताखीम हमदुले, नगरसेवक रमेश गौरक्षक, शेख अजहर, फारूख तुंडीवाले, नजीब लोहार, शेख शकील, संजय भगत, सय्यद जमिल, आरेफ खान, मुनवर लाला आदी उपस्थित होते. 

Tags : Jalna, Nanded, Imran, honor,  Marathwada Shree