Sun, Sep 27, 2020 03:48होमपेज › Jalna › पालिका कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

पालिका कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

Published On: Jun 03 2018 1:13AM | Last Updated: Jun 02 2018 11:49PMजालना : प्रतिनिधी

नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना भाजपचे नगरसेवक ज्ञानेश्‍वर ढोबळे यांनी काळे फासून शिवीगाळ व मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि. 2) रोजी कामबंद आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी राजेश खपले यांना निवेदन दिले.

निवेनात म्हटले आहे की, शनिवारी दुपारी साडेबारा वाजता नगर परिषदमध्ये  मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना भाजपचे नगरसेवक ज्ञानेश्‍वर ढोबळे यांनी तोंडाला काळे फासून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा नगर परिषद कर्मचार्‍यांनी निषेध नोंदवून नगरसेवक ढोबळे यांच्यावर कारवाई करण्यासाठी पालिका कर्मचार्‍यांच्या वतीने कामबंद आंदोलन करण्यात आले.

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात धर्मा खिल्लारे, राजराम गायकवाड, विजय फुलंब्रीकर, मोहन जामदार, नेल्सन कांबळे, राजेश कुरलीऐ, रत्नाकर अडसिरे, आनंद मोहिदे, संजय भालेराव, संतोष शिरगुळे, राजू मोरे यांच्यासह आदी कर्मचार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.