Mon, Jul 06, 2020 15:53होमपेज › Jalna › रस्त्याच्या कामासाठी आंदोलनाचा इशारा

रस्त्याच्या कामासाठी आंदोलनाचा इशारा

Published On: Apr 22 2018 1:12AM | Last Updated: Apr 21 2018 10:52PMपिंपळगाव रेणुकाई  :  प्रतिनिधी  

भोकरदन तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. या खराब रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेकांना प्राणही गमवावे लागले आहे. रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी शिवसेनेच्या वतीने 28 एप्रिल रोजी  रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.पारध, वालसांवगी, पारध, जळगाव सपकाळ आणि भायडी विभागाच्या वतीने वालसांवगी फाटा येथे रास्ता रोको करण्यात येणार आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती, पोलिस ठाणे आदींनी निवेदन देण्यात आले.  निवेदनात म्हटले की,  तालुक्यातील खराब रस्ते आणि अर्धवट असलेल्या पुलाच्या बांधकामासाठी शिवसेनेच्या वतीने अनेक वेळा निवेदन दिली. मात्र काहीच उपयोग झाला नाही. 

पिंपळगाव रेणुकाई मोठे बाजारपेठेचे गाव असल्याने  परिसरातील नागरिकांना तसेच विदर्भातील कुंबेफळ हा अवघडराव सावंगी येथून जाण्यासाठी मुख्य रस्ता आहे. हा रस्ता अत्यंत खराब असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.  मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे साफ दुर्लक्ष आहे.  यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलन ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. निवेदनावर तालुकाउपप्रमुख गणेश फुसे, संरपच सत्तार बागवान, उपसरंपच प्रकाश पाटील, मंगल गिरी, संजय काटोले, आंनदा खराडे, सुनील झोरे, सखाराम लोखंडे, महम्मद चाऊस, कलीम खान, इलियास खान, शालिक नरवडे, प्रकाश फुसे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Tags : Jalna, Movement, alert, road, work