Sun, Sep 27, 2020 03:56होमपेज › Jalna › मराठवाड्याचे पाणी रोखणार नाही : मुख्यमंत्री

मराठवाड्याचे पाणी रोखणार नाही : मुख्यमंत्री

Published On: Nov 04 2018 12:27AM | Last Updated: Nov 03 2018 11:27PMजालना : 

नगर व नाशिक जिल्ह्यांतून जायकवाडी धरणात सोडण्यात येणारे मराठवाड्याच्या हक्‍काचे पाणी रोखणार नाही. तसेच नाशिक व नगर जिल्ह्यावरही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.

जिल्ह्यातील दुष्काळ व कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी शनिवारी ते जालना येथे आले होते. यावेळी आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही ग्वाही दिली. ते  म्हणाले की, जायकवाडी धरणात भाजप सरकारच्या काळातच पाणी सोडण्यात आले आहे. पाणी प्रश्‍नावर विरोधकांनी राजकारण करू नये. मराठवाड्याला हक्‍काचे पाणी देतानाच नाशिक व नगर जिल्ह्यातील नागरिकांवरही अन्याय होऊ देणार नाही.