Mon, Jul 06, 2020 07:55होमपेज › Jalna › दुसर्‍या दिवशीही मराठा आंदोलन

दुसर्‍या दिवशीही मराठा आंदोलन

Published On: Jul 22 2018 1:01AM | Last Updated: Jul 21 2018 10:22PMजालना : प्रतिनिधी : 

जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेले आंदोलन दुसर्‍या दिवशीही सुरूच होते.परतूर येथे मराठा युवकांनी मुंडण, जाफराबादेत मोर्चा तर मंठ्यात धरणे आंदोलनाद्वारे शासनावरील रोष व्यक्‍त करण्यात आला. अनेक ठिकाणी बाजारपेठ बंद ठेवून व्यापार्‍यांनीही कडकडीत बंद पाळला.

परतूर : प्रतिनिधी

परळी  आंदोलनाला समर्थन तसेच मराठा समाजाच्या आरक्षण व  शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसह  विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर शनिवारी  अनेक तरुणांनी मुंडण करीत शासनाविरुद्ध रोष व्यक्त  केला. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या पदाधिकार्‍यांनी यावेळी दिला.

मराठा सामाजाच्या आंदोलनास व्यापारी महासंघाने पाठिंबा देत आपली दुकाने स्वयस्फूर्तीने बंद ठेवली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, मुस्लिम समाज, सामाजिक राजकीय संघटनांनी आंदोलनांच्या ठिकाणी उपस्थित राहत यावेळी पाठिंबा  व्यक्‍त केला. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार  सुरेशकुमार जेथलिया, अन्वर देशमुख, राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष कपिल आकात, जि.प. सदस्य शिवाजी सवने, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके, विद्यार्थी सेनेचे विष्णू माकोडे आदींनी पाठिंबा दिला.

जाफराबादेत मोर्चा

जाफराबाद : प्रतिनिधी 

तालुक्यातील शाळकरी मुलांनी शनिवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी नायब तहसीलदार जी.डी. खैरनार यांना निवेेदन देण्यात आले.

शहरात शुक्रवारी धरणे आंदोलनानंतर तालुक्यातील विविध गावांतील तरुणांनी  छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या  पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.यावेळी घोषणांनी परिसर दुुमदुमुन गेला.  मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाारा यावेळी देण्यात आला. मोर्चात विशाल शिंदे, विशाल बनकर, योगेश वाकडे, विष्णू चव्हाण, अरुण सुर्दिक, सतीश सांगळे, शंकर उगले, विशाल फलके, रामेश्वर फरके यांच्यासह  तरुण उपस्थित होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  

मंठ्यात ठिय्या आंदोलन

मंठा : प्रतिनिधी 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारपासून सुरू केलेले ठिय्या आंदोलन शनिवारी दुसर्‍या  दिवशी सुरू होते. या आंदोलनाला विविध पक्ष संघटनांनी पाठिंबा दर्शवला. यावेळी विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनी आंदोलनस्थळास भेट दिल्या.

शहरातील मुस्लिम समाज व टिपू सुलतान युवा मंचच्या वतीने मराठा क्रांती मोर्चाच्या अांदोलनास पाठिंबा दर्शविला. आरक्षणाची मागणी मान्य झाल्याशिवाय ठिय्या आंदोलनातून उठायचे नाही, असा पवित्रा मराठा सकल बांधवांनी घेतला आहे. 

याबाबत नायब तहसीलदार ए.टी. घोबाळे यांना निवेदन  देण्यात आले. हजरत टिपू सुलतान युवा मंचाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी प्रा. सदाशिव कमळकर व अली कुरेशी यांनी मनोगते व्यक्त केली. 

याप्रसंगी युवा मंचचे तालुकाध्यक्ष मोसीन कुरेशी, कय्यूम कुरेशी, मुसा कुरेशी, कबिर तांबोळी, सिराज खा पठाण, लाला खासाब, शेख राफियोद्दीन, मोईन कुरेशी, इल्यास कुरेशी, इसम्मोद्दीन पटेल आदींची उपस्थिती होती.