Wed, Dec 02, 2020 09:23होमपेज › Jalna › कर्मचार्‍यांना हुसकावून लावले कुलूप

कर्मचार्‍यांना हुसकावून लावले कुलूप

Published On: Jul 26 2018 1:32AM | Last Updated: Jul 25 2018 11:50PMजाफराबाद : प्रतिनिधी 

मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या आंदोलकांनी  मंगळवारी  शहरातील शासकीय कार्यालयात घुसून कर्मचार्‍यांना बाहेर काढून कुलूपबंंद आंदोलन केले. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून शिवाजी महाराजांच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून  मोर्चाला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला मुख्य रस्त्याने मोर्चा जात असताना  पंचायत समिती कार्यालयात घुसून आंदोलकांनी कर्मचार्‍यांना बाहेर काढून कार्यालयास कुलूप ठोकले. त्यानंतर तहसील, कृषी, भूमी अभीलेख, दुय्यम निबंधक कार्यालय यांसह सर्व शासकीय कार्यालये बंद करीत त्यांना कुलूप  ठोकण्यात आले. यानंतर तहसील प्रांगणात पुढील मोर्च्याची रुपरेषा ठरविण्यात आली. शहरातील सर्व बँका शाळा, महाविद्यालये यावेळी बंद होत्या. मोर्चात मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव सहभागी झाले होेते. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्तात होता. रुड येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. 

आज रास्ता रोकोसह चक्‍का जाम आंदोलन

जाफराबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुरुवारी सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत रास्ता रोको व  चक्‍का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. माहोरा येथेही रास्ता रोको व चक्‍का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलन शांततेत करावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.