Mon, Jul 06, 2020 15:32होमपेज › Jalna › वेळ आल्यावर सर्वांचीच नावे उघड करू : अशोक चव्हाण

वेळ आल्यावर सर्वांचीच नावे उघड करू : अशोक चव्हाण

Published On: Feb 16 2018 2:30AM | Last Updated: Feb 16 2018 2:30AMजालना : प्रतिनिधी

राज्यातील वेगवेगळ्या पक्षांचे अनेक नेते काँग्रेसच्या संपर्कात असून वेळ आल्यावर त्यांंची नावे उघड करू, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केला. 

खासदार चव्हाण म्हणाले की, भाजप सरकारच्या घोषणा दमदार असतात; मात्र अंमलबजावणीशून्य असते. मराठवाड्यात गारपिटीने शेतकर्‍याच्या मालाचे प्रचंड नुकसान झाले. जालना जिल्ह्यात गारपीट झालेल्या वंजार उम्रद, धार, जामवाडी आदी गावांना आम्ही भेटी दिल्या. शेतकर्‍यांना नॅशनल डिझायस्टरमधून नुकसानभरपाई पुरेसी ठरणार नाही. शासनाने 50 हजार रुपये एकरी मदत करावी ही आमची मागणी आहे. हा विषय विधिमंडळात लावून धरण्यात येणार आहे. त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर अथवा न्यायालयीन लढा लढण्याची आमची तयारी आहे. एमपीएससी सुशिक्षित बेरोजगारांची 1 लाख 77 हजार पदे रिक्त आहेत. पास झालेल्यांना फायदा नाही. त्यासाठी पदामधे वाढ करून पदे भरावी लागणार आहे. या प्रश्‍नावर काँग्रेस विद्याथ्यार्र्ंसोबत आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे हे शिक्षकांना सल्ले देत आहेत, मात्र त्यांना विद्याथ्यार्र्ंच्या प्रश्‍नांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. आरएसएस स्वयंसेवकांबरोबर सैन्याची मोहन भागवत यांनी केलेली तुलना दुर्दैवी आहे. मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी आरक्षणाबाबत तर विनय कटीयार यांनी मुस्लिमांबाबत असेच गंभीर वक्तव्य केले. असे वक्तव्य करणार्‍यांवर  कारवाई करणे गरजेचे आहे.  भाजप सरकारचा कारभार खोटारडे सरकार फसवणूक दमदार असा सुरू आहे. 

पत्रकार परिषदेला काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, हुसेन दलवाई, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चारुलता  टोकस, नाना पटोले, जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, माजी आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, राजाभाऊ देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या सरकारने मी शासनाचा लाभार्थी म्हणत लाखो रुपयांच्या जाहिराती दिल्या, मात्र प्रत्यक्षात ज्या लाथाथ्यार्र्ंचे फोटो जाहिरातीत छापले त्याच लाभाथ्यार्र्ंनी  पुढे येत लाभ मिळाला नसल्याचे सांगितल्याने या सरकारची पोलखोल झाली आहे. कर्जमाफी असो की, बोंडअळीचे नुकसान या सरकारने केवळ घोषणाबाजी करीत काम चालवले आहे. भाजप सरकारच्या कार्यकाळात सर्व घटक अडचणीत सापडले आहे. सरकारचे खरे लाभार्थी हे रामदेवबाबा असल्याचेही चव्हाण म्हणाले. 

आमदार सत्तार यांच्या वक्तव्याबाबत गैरसमज
सिल्लोड येथील कार्यक्रमात आमदार अब्दुल सत्तार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना निवडून आणण्यासाठी मदत करणार असे वक्तव्य केल्याचे निदर्शनास आणून देताच खासदार अशोक चव्हाण यांनी सदर वक्तव्याबाबत गैरसमज झाला असून ते काँग्रेसमधे आल्यास त्यांना निवडून आणू, असे सांगत त्यांनी प्रश्‍नाला बगल दिली.