Thu, Jul 09, 2020 03:55होमपेज › Jalna › तर मंत्र्यांना फिरू देणार नाही : खा. शेट्टी

तर मंत्र्यांना फिरू देणार नाही : खा. शेट्टी

Published On: Feb 06 2018 1:45AM | Last Updated: Feb 05 2018 10:41PMराजूर : प्रतिनिधी

शेतकर्‍यांना बोंडअळींचे पैसे न मिळाल्यास मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

बदनापूर, चनेगाव येथे रविवारी रात्री जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी रविकांत तुपकर, रसीका ढगे, पूजा मोरे, प्रकाश पोकळे, माणिक कदम, साईनाथ चिन्‍नदोरे, गजानन बंगाळे, बळीराम पुंगळे, निवृत्ती शेवाळे, वैजिनाथ ढोरकुले, सदाशिव जायभाये, शिवाजी भोसले, मयूर बोर्डे आदींची उपस्थिती होती.

खा. शेट्टी म्हणाले की, नुकताच जाहीर झालेला अर्थसंकल्प हा शेतकर्‍यांसाठी गाजर आहे. भाजप सरकार हे केवळ घोषणांचे सरकार असून प्रत्यक्षात ते कोणालाही काही देत नाही. अशा घोषणाबाज सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व पालकमंत्री बबनराव लोणीकर या जिल्ह्यातील आहे. राजुरेश्‍वराचे भक्‍त आहेत. केंद्रात सत्ता आहे.  या वेळी वस्त्रउद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर म्हणाले की, राजूर महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. राजूर तालुका व्हावा, अशी परिसरातील 100 गावांची मागणी आहे. 

या गावांनी ठराव दिलेले आहे. शासन दरबारी प्रस्ताव पडून आहे. भाजपचे नाकर्ते सरकार तालुक्याची घोषणा करू शकलेले नाही. सर्वसामान्य नागरिक व शेतकर्‍यांच्या हितासाठी राजूर तालुका झालाच पाहिजे. स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्वसामान्यांच्या पाठीशी आहे, असेही ते म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने राजूर व परिसरातील शेतकरी व नागरिक उपस्थित होते.