Thu, Jul 09, 2020 05:11



होमपेज › Jalna › जालना : घनसावंगीमधून मनसेचे जिल्हाध्यक्ष बळीराम खटके रिंगणात उतरणार

जालना : घनसावंगीमधून मनसेचे जिल्हाध्यक्ष बळीराम खटके रिंगणात उतरणार

Published On: Sep 22 2019 4:03PM | Last Updated: Sep 22 2019 2:57PM

मनसेचे जिल्हाध्यक्ष बळीराम खटके



वडीगोद्री (जालना)  : प्रतिनिधी

घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून मनसेचे जिल्हाध्यक्ष बळीराम खटके हे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे. मनसे निवडणूक लढणार असून मी ही घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून मनसेकडून निवडणुक लढणार असल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष बळीराम खटके यांनी दैनिक 'पुढारी'शी बोलताना सांगितले.

राज ठाकरे यांनी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढण्याचे जाहीर केले असून तयारीला लागण्याचा आदेश दिला आहे. मनसे ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे औरंगाबादसह निवडणूक लढणार आहे. मनसे विधानसभेच्या १०० जागा लढवणार आहे. राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे सांगितल्यानंतर मनसेकडून जिल्हाध्यक्ष बळीराम खटके हे इच्छुक आहेत. त्यांनी अप्रत्यक्षरित्या प्रचारालाही सुरुवात केली असल्याने आता लढत चौरंगी होती की काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

घनसावंगी मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून राजेश टोपे, शिवसेनेकडून डॉ. हिकमत उढाण यांची उमेदवारी निश्चित आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून माजी जि.प. सदस्य धनगर समाजाचे नेते देविदास खटके तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनसेचे जिल्हाध्यक्ष बळीराम खटके हे रिंगणात असून दोघेही बंधू इच्छूक आहेत.

वडीगोद्रीतूनन दोन बंधू आमदारकी लढण्यास इच्छुक

वडीगोद्री येथील माजी जि.प. सदस्य धनगर समाजाचे नेते देविदास खटके व मनसेचे जिल्हाध्यक्ष बळीराम खटके हे दोघे आमदारकी लढण्यास इच्छुक आहेत. माजी जि.प.सदस्य देविदास खटके हे वंचीत बहुजन आघाडीकडून आमदारकी लढण्यास इच्छुक आहेत. मनसेचे जिल्हाध्यक्ष बळीराम खटके हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून इच्छुक आहेत. दोन बंधू निवडणूक रिंगणात आमदारकीसाठी  इच्छुक असल्याने आता घनसावंगी मतदार संघात मतविभाजन होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.